spot_img

रॉयल किड्स स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना  अभिवादन

रॉयल किड्स स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना  अभिवादन

●मिररवृत्त

●अमरावती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गोपाल नगर येथील रॉयल किड्स स्कूलच्या वतीने छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने गोपाल नगर परिसरात रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर रॅली गोपाल नगर चौकात पोहोचली.छोट्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला.
देशातील अठरा पगड जातींना समान न्याय देणारे हिंदवी स्वराज्याची स्थापना करत समस्त देशवासीयांच्या मनावर अधिराज्य करणारे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त परिसरातील नागरिकांनी एकमेकांना शुभकामना दिल्या. रॉयल किड्स स्कूल गोपाल नगर शाळेचे अध्यक्ष प्रफुल्ल वाकोडे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात केले .
अभिवादन समारोह प्रसंगी परिसरातील लोकसेवक नाना बारबुधे, गजाननराव गोमासे, पद्माकर बहाळ, जय पुरोहित,शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती सरकटे,पूजा इंदूरकर, सोनाली सुर्यवंशी, अंकिता वितोंडे, योगिता महल्ले,राणी खंडार,योगिता मानमोडे अणि परिसरातील शिवप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अभिवादन सोहळ्यानंतर जय पुरोहित यांनी पेढे तर बालाजी सेल्सचे गजानन गोमासे यांनी खाऊ वाटप केला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!