spot_img

केकतपुर येथे प्रहारच्या शाखेचे उदघाटन ,अनेक कार्यकर्त्यांचा प्रहार मध्ये प्रवेश

केकतपुर येथे प्रहारच्या शाखेचे उदघाटन
◆अनेक कार्यकर्त्यांचा प्रहार मध्ये प्रवेश
◆मिररवृत्त
◆अमरावती
      आ.बच्चू कडू यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन केकतपुर येथील कार्यकर्त्यांनी प्रहार पक्षात प्रवेश घेऊन नुकतेच केकतपूर येथे पक्षाच्या शाखेची स्थापना केली. शिवजयंती निमित्य प्रहारच्या शाखेचे उदघाटन करून केकतपुर येथे नामफलकाचे उदघाटन करण्यात आले.
    शिवजयंतीचे औचित्य साधून सोमवारी सकाळी केकतपुर येथे प्रहार पक्षाच्या नामफलकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रहार चे जिल्हाप्रमुख
छोटू महाराज वसू,विदर्भ प्रमुख संजय  देशमुख, प्रहार चे अमरावती तालुका प्रमुख जोगेंद्र मोहोड,निनाद चिकटे ,गजानन मोहोड अश्विन मोहोड, सागर मोहोड, अनिकेत मोहोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
     छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण व अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे उदघाटन करण्यात आले. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रहार पक्षात प्रवेश घेतला.यावेळी गावातील सरपंच,उपसरपंच व गावकरी तसेच शाखा प्रमुख संतोष परतेती व उपशाखा प्रमुख अशोक लांडे व सचिव प्रशांत गोंडाने यांची उपस्थिती होती.
spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!