spot_img

‘गाव चलो अभियान’ अंतर्गत भाजपचा केकतपुर येथे संवाद

‘गाव चलो अभियान’ अंतर्गत भाजपचा केकतपुर येथे संवाद

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे.भाजप पदाधिकाऱ्यांचा वतीने नुकतेच केकतपुर येथील बूथ क्र.१३७,१३८ येथे भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.भारत सरकारच्या योजना,गावातील विकास कामांबाबत गावकऱ्यांना माहिती देऊन शासनाच्या गतिमान कार्याबाबत नागरिकांना अवगत करण्यात आले.
या अभियानात भाजपा जिल्हा महामंत्री विवेक गुल्हाने, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष श्रीखंडे, जिल्हा सदस्य नागेंद्र तायडे यांचेसह अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सामील झाले होते. पदाधिकारी यांनी बूथ ला भेटी दिल्या त्यानंत गावकऱ्यांशी संवाद साधला.नवमतदारांशी चर्चा करून येत्या निवडणुकीत आवर्जून मतदान करण्याचे आवाहन विवेक गुल्हाने यांनी केले.गावातील सर्व नागरिकांनी सुद्धा भाजपच्या या अभियानात सहभागी होऊन भारत सरकारच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार करायला पुढाकार घेतला.यावेळी बूथ प्रमुख स्वप्नील हरणे,सुधीर जाधव ,अमोल भुजाडे, संजय कोहळे,
यांचेसह भाजप कार्यकर्ते,पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!