spot_img

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील उद्या अमरावतीत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
चंद्रकांत(दादा) पाटील उद्या अमरावतीत

◆मिररवृत्त

◆अमरावती

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील हे उद्या बुधवार, दि. 21 फेब्रुवारी 2024 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.बुधवारी सकाळी 7.55 वाजता अमरावती रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी 8.10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.15 वाजता शासकीय येथून वाहनाने राजापेठकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता डॉ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी आगमन व सात्वंनपर भेट. सकाळी 11 वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा हॉल, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे आगमन व भाजपा, कामगार मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश आयोजित बांधकाम कामगांराना गृहपयोगी वस्तू संच वितरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता अमरावती तालुका प्रशासकीय इमारत, मोर्शी रोड येथे आगमन व तालुका प्रशासकीय इमारत लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, दुपारी 4 वाजता शासकीय तंत्रनिकेतन, गाडगे नगर येथे आगमन व शासकीय तंत्रनिकेतन येथे जिल्हा नियोजन समिती निधातून मंजूर कंपाऊंड वॉल भूमिपूजन समारंभ व संस्थेस सदिच्छा भेट. सायंकाळी 5 वाजता पोलीस आयुक्त कार्यालय शहर येथे आगमन व पोलीस आयुक्तालय यांनी जिल्हा नियोजन समिती निधातून मंजुर 18 चारचाकी व 10 दुचाकी वाहनांचा हस्तांतरण सोहळा व नुतनीकरण सभागृहाचे उद्घाटनास उपस्थिती असणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता एसटी बस स्थानकासमोर सायन्स स्कोर मैदान येथे आगमन व पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे आयोजित महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!