spot_img

रस्ता सुरक्षा मोहिमेत जनतेचा सहभाग वाढविणार प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांचे प्रतिपादन

रस्ता सुरक्षा मोहिमेत जनतेचा सहभाग वाढविणार

◆प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांचे प्रतिपादन

◆मिररवृत्त
◆अमरावती

रस्त्यावर चालणारे पादचारी व वाहनधारकांच्या सुरक्षेचा गंभीर विषय झाल्याने,रस्ता सुरक्षा मोहिमेत जास्तीत जास्त जनतेचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येईल, त्यामुळे निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांनी केले.बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोपिय कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.
दिनांक 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या एक महिन्याच्या कालावधी करिता राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2024 संपूर्ण राज्यात राबविण्यात आले होते.त्या अनुषंगाने बुधवारी या अभियाचा समारोप करण्यात आला.या वेळी सिद्धार्थ ठोके सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, संजय अंबाडकर लेखा अधिकारी,वैभव गुल्हाने मोटार वाहन निरीक्षक,डॉ.प्रकाश मेश्राम मनपा शिक्षणाधिकारी तथा आर एस पी कार्याध्यक्ष,विजय गावंडे,प्रदीप गुडदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती.

गीते पुढे म्हणाले की,रस्ता सुरक्षा संदर्भात शासनाकडून पाच कोटीचे अनुदान प्राप्त झालेले असून याबाबत जनतेकडून रस्ता सुरक्षेत सहभागी होणाऱ्या विविध सेवाभावी संस्थांकडून अभिप्राय मागविण्यात येणार आहे.रस्ता सुरक्षेच्या निधीचा कुठे आणि कसा वापर करायचा हे आलेल्या अभिप्रायांवरून ठरविण्यात येणार आहे.
यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहे. रस्ता सुरक्षा संदर्भात येणाऱ्या अभिप्रायाची दखल घेण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त जनतेने आपले अभिप्राय नोंदवावे असे आवाहनसुद्धा गीते यांनी केले.


यावेळी महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन अमरावतीचे आर.एस.पीच्या बारा अधिकाऱ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले.यामध्ये डॉ.प्रकाश मेश्राम,धाकुलकर सर ,अजय शर्मा,दीपक लव्हाळे,आनंद महाजन, ऑफिस खान ,मुजमिल सर , शिरीष फसाटे,चंद्रकांत गुल्हाने,प्रकाश माहुलकर,चंद्रकांत गुलवाडे , सागर सिंह कनकुरे या आर एस पी अधिकाऱ्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने हेल्मेट देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.
ग्रामीण भागामधून शहरात दूध वाटप करायला येणाऱ्या वाहन चालकांना दुर्गा मोटर्स, जीपीएस मोटर्स,साईनाथ मोटर्स परतवाडा , आयराईड बजाज चेतक यांच्याकडून हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.नाशिक येथे परिवहन विभागाच्या राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुवर्णपदके प्राप्त केल्याने गौरव शेलार मोटर वाहन निरीक्षक , श्रीमती पल्लवी दौंड मोटर वाहन निरीक्षक , स्वप्निल खडसे लिपिक मोहम्मद अथर वाहन चालक तसेच रक्तदान करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला यामध्ये सागर तसरे, सिद्धांत दहेकर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची संचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर यांनी केले. या कार्यक्रमाला आरएसपी अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी ऑटो डीलर युनियनचे पदाधिकारी, आदी मंडळी उपस्थित होती.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!