spot_img

शिवजयंती निमित्य १९ ला वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन,दोन गटात पार पडणार स्पर्धा

शिवजयंती निमित्य १९ ला वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

◆दोन गटात पार पडणार स्पर्धा

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने १९ फेब्रुवारी रोजी संत काशिनाथ बाबा सभागृह येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून अ गटाला वय १४ ते १७ व ब गटाला वय १८ ते ३० अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.सायंकाळी ६ वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
शिवरायांचे बालपण,शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग,स्त्री शिक्षणाचे महत्व असे अ गटासाठी विषय असून स्वराज्यातील स्त्री स्वातंत्र,शिवरायांचा वैज्ञानिक दृष्टिकोन,शिवराज्य कारभारातील लोकशाही असे ब गटासाठी विषय असणार आहे. दोन्ही गटासाठी प्रथम बक्षीस ५००१ रुपये तर द्वितीय बक्षीस २००१ रुपये असून प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
वक्तृत्व स्पर्धेसाठी इच्छुक स्पर्धकांनी धीरज खोकले (९३७३४०७३५४),अमित डोईफोडे (९०९६४८६१०९),ऋत्विक इंगोले (९०२२६७२६३४),नितीन पोटफोडे (७७०९५६९०२१) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिवमित्र परिवार व आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!