spot_img

खेळात राजकारण करू नका- अभिजित ढेपे ,नांदगाव खंडेश्वर येथे आय.पी.एल क्रिकेट सामन्याचे उद्घाटन

खेळात राजकारण करू नका- अभिजित ढेपे

◆नांदगाव खंडेश्वर येथे आय.पी.एल क्रिकेट सामन्याचे उद्घाटन

◆मिररवृत्त

◆नांदगाव खंडेश्वर

राजकारण करण्यासाठी अनेक गोष्टी आहे फक्त खेळाच्या मधात राजकारण करू नका असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी केले.
शहीद जवान विकास उईके,ए.पी.जे अब्दुल कलाम बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित क्रिकेट सामन्यांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

या आयपीएल क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे, शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या हस्ते पार पडले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल गुल्हाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे मो.साजिद, काँग्रेसचे इद्रिस भाई, शेख हारून, कृउबासचे धनंजय मेटकर,पत्रकार अथर खान, संदीप कणसे,सदा देवक्तते, शेख मुस्ताक भाई,परवेज लधानी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

पाच दिवस आयपीएल क्रिकेटचे सामने होणार असून विजेत्या संघास  प्रथम बक्षीस ४० हजार रुपये (अभिजीत ढेपे अमित देशमुख यांच्या तर्फे),द्वितीय बक्षीस  २० हजार ररुपये (राहुल गुल्हाने यांच्याकडून) तसेच मॅन ऑफ द मॅच सह अनेक बक्षीस ठेवण्यात आली आहे.या स्पर्धेच्या यशस्विते करिता ए.पी.जे अब्दुल कलाम बहुद्देशीय संस्थेचे मो. सुपीयांन, अब्दुल राजीक, मो.तौसिफ शहजाद सर, डॉ मुद्दशीर, मो. वसीम,खालिद अन्वर, मो लुगमान, यांचेसह अन्य पदाधिकारी  परिश्रम घेत आहेत.
‘आय पी एल क्रिकेट स्पर्धा ही नांदगाव शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असून तरुणांनी जास्तीत जास्त खेळाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी केले’

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!