spot_img

सरस्वती इंग्लिश प्री-प्रायमरी स्कूलचे स्नेहसंमेलन थाटात

सरस्वती इंग्लिश प्री-प्रायमरी स्कूलचे स्नेहसंमेलन थाटात
◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ
     सरस्वती गोसावी शिक्षण प्रसारक संस्था, नांदगाव पेठ अंतर्गत सरस्वती इंग्लिश प्री अँड प्रायमरी स्कूल चे स्नेहसंमेलन नुकतेच संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड अमरावती येथे संपन्न झाले.
      कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सरस्वती गोसावी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या  स्वाती गोसावी या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षण अधिकारी डी. एन. वानखडे, ए. एस. डाखोरे,सरस्वती गोसावी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गोसावी,उपाध्यक्ष सतीश पुरी प्रामुख्याने उपस्थित होते.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक लुकेश यावले यांनी केले तर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध उपक्रमा अंतर्गत बक्षीसे वितरित करण्यात आली. कार्यक्रमात नर्सरी ते वर्ग सातवी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या बहारदार सामाजिक, अध्यात्मिक, समाजप्रबोधत्मक नृत्य व नाटिकेने उपस्थित्यांची मने जिकंली.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागात आणून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळा प्रशासन सदैव कसोसीने प्रयत्न करत असते हे विशेष!
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे संपूर्ण शिक्षक कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल बस चालक यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका शुभांगी घरडे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका कु. ऐश्वर्या माहोरे यांनी केले.स्नेहसमेलनाला पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!