spot_img

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात राष्ट्रवादीची निदर्शने ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणखी सक्रिय लोकशाही नष्ट करण्या प्रयत्न- डॉ. हेमंत देशमुख

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात राष्ट्रवादीची निदर्शने
◆राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणखी सक्रिय
◆लोकशाही नष्ट करण्या प्रयत्न- डॉ. हेमंत देशमुख
◆मिररवृत्त
◆अमरावती
     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार ) विरोधात निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संतप्त भावना व्यक्त करण्यात येत असून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसp पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करून यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
निवडणूक आयोग दबावाला बळी पडत असून केंद्र आणि राज्य शासन संविधानिक संस्था दुबळ्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अमरावती शहर अध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख यांनी केला आहे.
     शहर कार्यकारिणीच्या वतीने घेण्यात बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना या प्रकारचा जाहीर निषेध केला असून आपण सर्व भरभक्कमपणे आणि समर्थपणे शरद पवार यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहण्याचा संकल्प करण्यात आला तर आमचे चिन्ह आणि आमचा पक्ष केवळ शरद पवार हेच असून यापुढे केवळ शरद पवार यांना केंद्रस्थानी ठेवून निवडणूकीमध्ये घात करणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून काढण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.
    यावेळी  शहर अध्यक्ष प्रा.डॉ. हेमंत देशमुख, अँड. घनश्याम ढोले, अॅड. संजय भोई ,प्रभाकरराव गायकवाड, विशाल बोरखेडे, अमित गावंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.या सभेला सय्यद मंसूर, राजेंद्र चिंचमलानपुरे, रावसाहेब वाटाणे, सतिश देशमुख, कृष्णराव चौधरी, बेगा माजीद, मंगेश भटकर, वर्षाताई गतफणे, संजीवनी काळे,
डॉ. दिव्या शिसोदे, वर्षा भटकर, छाया देशमुख, डॉ. अशोक पातुर्डे, अरुण उमाळे, सतिश चरपे, आसिफ खान, दिलावर शहा,रोशन कडू, विनेश आडनिया, अरबाज पठाण, इशाक भाई,वसंत पाटील, शेख शकील, आरीफ शेख, नूर सुबह नूरी, ज्योती दारोकर जेहरुन्नीसा शेख, परवीन अनुम, सुजाता कोठारे, भूषण लोणारी, अब्दुल रहेमान, विक्रम ढोके, निखिल भोजे, अक्षय ढोले आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थीत होते.
spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!