spot_img

जे.जे ऍक्ट व पोक्सो कायदा विषयक बाल पोलीस पथक सदस्यांची दोन दिवसीय कार्यशाळा

जे.जे ऍक्ट व पोक्सो कायदा विषयक बाल पोलीस पथक सदस्यांची दोन दिवसीय कार्यशाळा
◆मिररवृत्त
◆अमरावती
      5 व 6 फेब्रुवारी रोजी  जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अमरावती,मिरॅकल फॉउंडेशन,युनिसेफ, मुस्कान फॉउंडेशन  पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्ह्यातील  पोलीस अधीकारी व कर्मचारी यांचे मंथन हॉल, जोग स्टेडियम अमरावती येथे बाल न्याय (काळजी व संरक्षण ) अधीनियम 2015 व बाल लेंगिक अत्याचार प्रतिबंध अधीनियम 2012 (पोकसो कायदा) विषयक बाल पोलीस पथक यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण पार पडले.
    प्रशिक्षनाचे संचालन ऍड. सीमा भाकरे यांनी तर प्रास्तविक संदीप कांबळे मिरॅकल फॉउंडेशन यांनी केले.जे.जे ऍक्ट बाबत विपला फॉउंडेशनचे अनिरुद्ध पाटील  यांनी तर बाल लैंगिक अत्याचार व त्या अनुषंगाने घडणारे विविध प्रकारचे गुन्हे, त्याबद्दल घ्यावयाची  खबरदारी व उपाययोजना याविषयीं मुस्कान फॉउंडेशन चे प्रशिक्षक प्रदीप पाटील व  पूजा मॅडम  यांनी  सविस्तर मार्गदर्शन केले.
   या प्रशिक्षण कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी  पोलीस निरीक्षक अर्जुन  ठोसरे हे होते तर उदघाट्क म्हणून महिला बाल विकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून  श्रीमती किरण पुंशी (बाल कल्याण समिती अध्यक्ष), वासनिक, श्रीमती.उज्वला श्रीराव (बाल न्यायमंडळ सदस्य) अजय डबले (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमरावती) आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
   या प्रशिक्षण कार्यशाळेत सुचिता बर्वे, दीपाली महाजन, सारिका तेलखडे, ऍड सीमा भाकरे, भूषण कावरे, नम्रता कडू, कीर्ती सगणे, आकाश बरवत, शशांक वैद्य, मनीषा फुलाडी, राहुल वैराळे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!