spot_img

अकोल्यातील धक्कादायक प्रकारः ,जि.प. उर्दू शाळेच्या टेरेसवर आढळले 1 नवजात मृत अर्भक

अकोल्यातील धक्कादायक प्रकारः

◆जि.प. उर्दू शाळेच्या टेरेसवर आढळले 1 नवजात मृत अर्भक

◆मिररवृत्त

◆अकोला

शहरातील रतनलाल प्लॉट परिसरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या टेरेसवर कचऱ्यात एक नवजात मृत अर्भक आणि तीन मांसाचे तुकडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास समोर आली.घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून,तपास सुरु केला आहे.

रतनलाल प्लॉट परिसरातील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या आवारातील मैदानात रविवारी सकाळी दहाच्या
सुमारास लहान मुले क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल (चेंडू)
शाळेच्या टेरेसच्या वर गेला. तो काढण्यासाठी मुले वर गेली
असता संतोष काळभागे या मुलाला एका प्लास्टिकच्या
पिशवीत गुंडाळलेली मृतावस्थेतील एक अर्भक आणि मांसाचे
आढळून आली. ४ ते ५ महिन्याचे हे अर्भक पाहिल्यानंतर मुले
घाबरून गेली व त्यांनी याबाबतची माहिती लगेच परिसरातील
काही नागरिकांना दिली.
या प्रकाराची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत अर्भक ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान अर्भक एक असून, उर्वरित तीन मांसाचे तुकडे असल्याचे सिव्हिल लाइन पोलिसांनी दाखल केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!