चिमुकल्यांच्या बहारदार कलाविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली!!
■ जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
■ चौदा पंचायत समितीतील विद्यार्थ्यांचा सहभाग
■मिररवृत्त
■अमरावती
जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांच्या बहारदार कलाविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी चौदा पंचायत समितीतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या पटांगणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये एकांकिका,नाटिका,भावगीत, लोकगीत, सिनेगीत, समुह नृत्य, एकल नृत्य,अभिनय, हास्य जत्रा, निदर्शने अशा बहारदार कार्यक्रमाचे यावेळी सादरिकरण करण्यात आले. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांव्दारे शालेय विद्यार्थ्यांत अभिजात कलेचा आविष्कार दिसून आला.
सांस्कृतिक कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने,गजाला नाजली ई.खान, गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, धनंजय वानखडे, दिपक कोकतरे,डाॅ.नितिन उंडे, प्राचार्य गगांधर मोहने,डी.सी.गायकवाड, प्रमिला शेंडे, रजनी शिरभाते,
निखील मानकर, आश्विन मानकर, संगिता सोनोने,नंदकिशोर खरात, रामेश्वर माळवे,गुणवंत वरघट, आर.एस.निंभेकर, राजेश नाईक,संतोष घुगे,अशफाक अ.रज्जाक,ज्ञानेश्वर गिरी,क्रीडा संयोजक व शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण खांडेकर यांची उपस्थिती होती.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मोर्शी,नांदगाव खंडे,चांदुर रेल्वे,चांदुर बाजार,दर्यापूर,अंजनगाव सूर्जी,धामणगाव रेल्वे,अमरावती,वरुड,तिवसा,चिखलदरा,भातकुली,धारणी,अचलपूर या पंचायत समितीमधील विद्यार्थ्यांनी आपला कलेचा आविष्कार सादर केला. कार्यक्रमाचे संचालन शैलेश दहातोंडे, शीला मसराम , शेख शकील, वनिता बोरेडे यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा.डॉ.मनोज उज्जैनकर,प्रा.विश्वनाथ निळे व वैभावी गोळे यांनी कर्तव्य बजावले.असे क्रिडा महोत्सवाच्या प्रसिध्दी समितीचे राजेश सावरकर, विनायक लकडे, शकील अहमद यांनी कळविले आहे.
●उद्या पारितोषिक वितरण●
पारितोषिक वितरण सोहळा उद्या शुक्रवारला (ता.९) होणार असून या सोहळ्याचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा हे भुषवतील.तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, डी.आर.डी.ए.च्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख विभागीय क्रीडा संचालक विजय संतान,जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके,जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस,मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे,जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव उपस्थित राहणार आहे.
●सांघिक व वैयक्तीक स्पर्धा मध्ये प्राथमिक विभागात सांघिक●
खेळात कबड्डी (मुले),कबड्डी (मुली), खो-खो (मुले), खो-खो (मुली) लंगडी मुली,वैयक्तिक स्पर्धेत ७५ मी. धावणे (मुले) ७५ मी. धावणे (मुली), लांब उडी (मुले), लांब उडी (मुली), उंच उडी (मुले,) उंच उडी (मुली), दोरीवरील उडया (मुली) तर माध्यमिक विभागात सांघिक खेळात कबड्डी (मुले),कबड्डी (मुली),खो-खो (मुले),खो-खो (मुली),व्हॉलिबॉल (मुले),व्हॉलिबॉल (मुली),
टेनिक्वाइड दुहेरी (मुली),बॅडमिंटन दुहेरी (मुले),बॅडमिंटन दुहेरी (मुली)१००*४ रिले (मुले)१००*४ रिले (मुली) हे खेळ आहे.वैयक्तिक स्पर्धेत १०० मी. धावणे (मुले),१०० मी. धावणे (मुली),लांब उडी (मुले),लांब उडी (मुली),उंच उडी (मुले),उंच उडी (मुली),कुस्ती (मुले),गोळा फेक (मुले),टेनिक्वाइड (मुली) हे खेळ प्रकार होते.या प्रकारातील यशवंत खेळाडू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.