spot_img

खडीमल येथे पाण्याची तीव्र टंचाई ,मेळघाटात पाणी टंचाईचे चटके : प्रशासनाला नियोजन करण्याची गरज

खडीमल येथे पाण्याची तीव्र टंचाई

◆मेळघाटात पाणी टंचाईचे चटके
◆प्रशासनाला नियोजन करण्याची गरज

◆मिररवृत्त
◆चिखलदरा

●अबोदनगो चव्हाण●

खडीमाल गावात गेल्या पंधरा दिवसापासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे आदिवासी बांधव मिळेल त्या ठिकाणावरून पाणी भरत आहेत चिखलदरा तालुक्यातील खडीमाल गावात पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही गावात दोन विहीर त्यात ही पाणी नाही त्यामुळे पाणी पुरवठा टँकरने करण्यात यावा अशी मागणी खडीमाल गावातील आदिवासी महिलांनी केली आहे. विहिरी मध्ये थोडे फार पाणी आहे ते पण गढुळच. त्यामुळे खडीमाल येथील गावकऱ्यांवर गढुळ पाणी पिण्याची वेळ आली आहे.
खडीमाल गावात पाण्याची टंचाई समस्या कायम आहे ग्रामपंचायतीने या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खडीमाल ग्रामवासी रिचु धिकार, रनाय कास्देकर, रिमु जामुनकर,सुगना धिकार, मिराय कास्देकर,दिनेश बेलकर,अनिल पंडोले,राजकुमार कोगे यांनी केला आहे. या गावात सार्वजनिक पिण्याची पाण्याची सोय नाही. गावात आदिवासी समाजाचे लोक राहतात. त्यांच्या समस्या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधीचे सुध्दा या समस्या कडे पुर्ण पने दुर्लक्ष झाले आहे. खडीमाल गावात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई कडे आता कोण लक्ष देणार असा सवाल आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे साहेब आम्ही आयुष्यभर गढूळ पाणी प्यायचे का ? असा प्रश्न या ठिकाणचे आदिवासी बांधवांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला आहे

■ टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी खडीमाल गावकऱ्यांनी केली आहे.या गावाची लोकसंख्या 1500 असुन मागील काही दिवसापासुन खडीमाल येथे पिण्याची पाण्याची टंचाई आहे या गावात दोन विहीर आहे विहीरीचे पाणी आटले आहे तेही पाणी रात्रभर जमा होते ते सकाळी गढुळ पाणी जमा होत असल्याने गावातील महीलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण दुरदूर भटकंती करावी लागते गडुढ पाणी पिल्याने आदिवासी लोकाचे आरोग्यास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना टँकर ने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

■ग्रामपंचायतीने आमच्या सर्व समस्या दूर कराव्या खडीमाल या गावात अनेक समस्या प्रलंबित आहेत भोळ्या भाबड्या जनतेची दिशाभूल न करता गावकऱ्यांना किमान मुलभुत सुवीधा तरी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्यावे अशी खडीमाल गावकऱ्यांची मांगणी आहे

‘मागील 15 ते 20 दिवसापासून आमच्या गावात पाण्याची तीव्र टंचाई भासली असून ग्रामसेवक तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून प्रशासनाने पाण्यासंबंधीत लवकरात लवकर नियोजन करावे व आम्हाला पाणीपुरवठा करावा अशी प्रतिक्रिया येथील उपसरपंच राजु जामुनकर यांनी बोलतांना सांगितले’

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!