spot_img

नविनचंद्र रेड्डी यांचे मोबाईल असोसिएशनच्या वतीने अभिनंदन

नविनचंद्र रेड्डी यांचे मोबाईल असोसिएशनच्या वतीने अभिनंदन

◆मिररवृत्त
◆अमरावती

अमरावतीचे पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांची पोलीस महानिरीक्षकपदी बढती झाल्याने अमरावती मोबाईल डीलर असोसिएशन व ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
असोसिएशनचे बादल कुलकर्णी, रोहित लाहोटी, अनिल पमनानी, योगेश गुंडीयाल, सुनील पोपटानी, आदिल जांगडा आदींच्या वतीने पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच पोलीस महानिरीक्षकपदी बढती झाल्याबद्दल पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील प्रदान करण्यात आल्या. पोलीस आयुक्त यांनी अमरावती शहरात भयमुक्त वातावरण निर्माण करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेले कार्य अत्यंत प्रशंसनीय असल्याचे यावेळी मोबाईल असोसिएशनच्या वतीने आवर्जून उल्लेख करण्यात आला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!