spot_img

‘सावित्रीमाई’ ने लावले विधवा, परितक्त्या महिलांना ‘कुंकू’, विधवा महिलांच्या हळदी कुंकूने यावलीत परिवर्तनाची लाट

‘सावित्रीमाई’ ने लावले विधवा, परितक्त्या महिलांना ‘कुंकू’
विधवा महिलांच्या हळदी कुंकूने यावलीत परिवर्तनाची लाट

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

मंगेश तायडे

वर्षातील पहिला सण मकरसंक्रांत, संक्रांतीचे वाण सुवासिनींना देत तीळ गूळ घ्या गोड गोड बोला असा संदेश या निमित्ताने देण्यात येतो मात्र विधवा आणि परितक्त्या स्त्रियांना या सणापासून बाजूला ठेवण्यात येते.जणू समाजाने अश्या स्त्रियांना वाळीत टाकले असा काहीसा सुवासिनींचा समज असावा मात्र विधवा आणि परितक्त्या स्त्रिया या सुद्धा समाजाचा महत्वाचा भाग असून त्यांना अपमानित न करता त्यांचाही सन्मान वाढावा यासाठी सावित्रीमाई फुले महिला मंडळ यावलीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी विधवांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून परिवर्तनाची लाट आणली.
हळदी कुंकवाच्या कार्यक्रम समाजात मोठ्या थाटात साजरे होतात. घरगुती सोबतच सामूहिक हळदी कुंकू कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात येते मात्र महिलांच्या या हर्षोल्हासाच्या कार्यक्रमात विधवा महिलांना मात्र परवानगी नसते. विधवा आणि परितक्त्या महिलांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच नसते त्यामुळे पती नसल्याने आपला समाजात द्वेष होतो ही भावना विधवा महिलांच्या मनात घर करत होती.ही हीन भावना लक्षात घेऊन यावली शाहिद येथील मनीषा नागोणे यांनी मागीलवर्षी पासून विधवांच्या हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन सुरू केले.
सावित्रीबाई फुले महिला मंडळ यावली शहिद यांच्या वतीने महात्मा फुले चौक यावली शहीद याठिकाणी विधवा व परितक्त्या महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या माजी पंचायत समिती सदस्य व शहीद स्मारक समितीच्या सहसचिव ज्योती यावलीकर या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच निरंजना मेश्राम, छाया दंडाळे,मपंचायत सदस्य वैशाली वानखेडे, शिल्पा खवले, किरण किर्तकर, ज्येष्ठ नागरिक माजी पंचायत समिती सभापती लता पाचघरे आदी मान्यवर स्वयंसिद्धा उपस्थित होत्या.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण करून मनीषा नागोणे यांनी यांनी प्रास्ताविक करून या कार्यक्रमाची भूमिका विषद केली.सर्व विधवा महिलांना हळदी कुंकू लावून त्यांना वाण भेट देण्यात आले आणि तिळगुळ देऊन गोड गोड बोला आणि सन्मानाने जगा असा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा मनीषा नागोने
उपाध्यक्ष वर्षा भुरे,संघटक प्राजक्ता पाचघरे,
प्रचार प्रमुख वंदना वानखेडे,सदस्य राधिका सोळंके,ममता उनोणे,लतिका वाकोडे,आशा कोष्टी,सुनीता सोलंके,सुनीता वानखेडे यांचेसह असंख्य विधवा, परितक्त्या महिला भगिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा नागोणे यांनी केले तर आभार वृषाली खासबागे यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!