आदर्श शिक्षिका शीतल धरमठोक व पत्रकार मंगेश तायडे सन्मानित
◆जि.प.माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजन
◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षिका शीतल रवींद्र धरमठोक तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पत्रकार व शाळेचे माजी विद्यार्थी मंगेश तायडे यांना जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसमेलनामध्ये सन्मानित करण्यात आले. शाल,पुष्पगुच्छ देऊन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीने दरवर्षी माध्यमिक विभागातून देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी जि.प.माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव पेठ येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका शीतल रवींद्र धरमठोक यांना जाहीर झाला. त्यांनी शाळेमध्ये विविध अशा प्रकारचे अध्ययन पूरक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये कलागुण विकसित करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची दखल जिल्हा परिषदेच्या शिक्षक विभागाने घेतली असून यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना जाहीर झाला शिवाय याच शाळेचे माजी विद्यार्थी असलेले मंगेश तायडे यांनी पत्रकारितेत केलेले उल्लेखनीय कार्य तसेच दिल्ली येथे राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचा सुद्धा यावेळी जिल्हा परिषद माध्यनिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसमेलनामध्ये उपस्थित मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी विचारपीठावर सरपंच कविता डांगे, ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे, स्व.दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दरणे,जेष्ठ पत्रकार राजन देशमुख,जि.प. माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र ठाकरे, उपप्राचार्य रमेशराव वानखडे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गाडगे, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष प्रवीण जामोदकर व माजी अध्यक्ष अरुण राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उल्हास घारड व शिक्षिका आशिया शेख यांनी केले.