spot_img

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सोशल फोरमची स्थापना

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सोशल फोरमची स्थापना

◆मिररवृत्त
◆अमरावती

महाराष्ट्रातील महामानवाचे विचार,संस्कार व परंपरा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विषयांवर सामाजिक काम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रातील समस्या सोडविण्यासाठी तसेच समाजातील एकोपा जोपासण्याच्या दृष्टीने ना जात ना धर्म या विचारांचा वसा घेऊन राज्यातील महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, सामाजिक समस्या, अंधश्रद्धा निर्मूलन, औद्योगिक समस्या व शेतकऱ्यांचे विविध प्रश्न यांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र सोशल फोरमची स्थापना करण्यात आलेली आहे.
आज महाराष्ट्रातील परिस्थिती बघता सामाजिक, शैक्षणिक आर्थिक, औद्योगिक व राजकीय परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला, विद्यार्थ्यांना व महिलांना अनेक समस्याना दररोज तोंड द्यावे लागत आहे. परंतु प्रशासन व सरकार या सर्व विषयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या असून महिला सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झालेल्या आहेत त्याचबरोबर वाढत असलेली अंधश्रद्धा व जातीय ते या सर्व प्रश्नांमुळे महाराष्ट्राची संस्कृती व विचार यांना मलीन करण्याचे काम राज्यातील राजकीय व्यवस्थेमार्फत सातत्याने केला जात आहे.
या प्रसंगी प्रा. श्याम मानव अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती – संस्थापक अध्यक्ष यांची भेट घेऊन राज्यातील तरुणांची जबाबदारी व भूमिका काय असावी या बाबत चर्चा करून मार्गदर्शन घेतले. तसेच महाराष्ट्र सोशल फोरम तर्फे भविष्यात महाराष्ट्राचे हित जोपासले जाईल तसेच राज्याला नवीन दिशा दाखवण्याचे काम महाराष्ट्र सोशल फोरम मार्फत केल्या जाईल. अशी आशा सर्व बुद्धीजीवी लोकांनी व्यक्त केली .यावेळी सोशल फोरम चे गौतमभाऊ वानखडे, जयंत औतकर,नयन भाऊ मोंढे,संजय देशमुख, उमेश पंधरे,आर आर सरकार, पंकज सुरळकर, प्रवीण रायबोले, तुलसीदास झुंजुरकार,प्रज्वल चोखट,वैशाली वानखडे, पल्लवी सूर्यवंशी,मिलिंद पाटील, यांचेसह धर्मा वानखडे यांनी मार्गदर्शन केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!