spot_img

श्रीराम भक्त हनुमान मंडळाची भव्य शोभायात्रा शांततेत,ठिकठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी

श्रीराम भक्त हनुमान मंडळाची भव्य शोभायात्रा शांततेत

◆ठिकठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी

◆मिररवृत्त
◆चेतन हिंगे/अंजनगाव सुर्जी

अंजनगाव तालुक्यातील कापुसतळणी येथे श्रीराम भक्त हनुमान मंडळाच्या वतीने अयोध्ये येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठा अनुषंगाने आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभा यात्रेतील पारंपारिक ढोल ताशे पथकाचा जयघोष, भगवे ध्वज , प्रत्येक घरासमोर रांगोळी व दिवे यामुळे वातावरण दुमदुमून गेले होते. श्रीरामललाच्या जयघोषात आठवडी बाजारातील राम मंदिराच्या प्रांगणातून श्रीराम वेशभूषेत वेदांत रोकडे, लक्ष्मण वेशभूषेत सोहम महानकर , सीतामा वेशभूषेत कु. कृतिका सहारे, हनुमान वेशभूषेत साहिल शेवाणे यांना बग्गी रथात विराजमान करून सजीव देखाव्यासहित गावकरी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या शोभा यात्रेची सुरुवात आठवडी बाजार मंदिराच्या प्रांगणातून मंडळाचे अध्यक्ष अरुण शेवाणे, उपाध्यक्ष नंदकिशोर भागवत, सचिव नितीन शेवाणे, सदस्य अनिल फरकुंडे , ज्ञानेश्वर दा. रोकडे, रामेश्वर कुटे, बालमुकुंद शेंडे, भास्कर कुटे, बंटी फरकुंडे आदींच्या उपस्थितीत शोभा यात्रेची सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रे मार्गावर घरोघरी दिवे लावण्यात आले होते. रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, आणि ठिकठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी झाली होती. यामुळे कापुसतळणी गावाला अयोध्या चे रूप आले असल्याचे शोभायात्रेत बोलल्या जात होते. या ऐतिहासिक आनंद उत्सवाचे फोटो सेशन ड्रोन कॅमेऱ्याने करण्यात आला होते हे विशेष. शोभायात्रा मार्गावर गाडगे बाबा चौकात 50 किलो वजनाचा धनुष्य बाण व भगवा ध्वज उभारण्यात आला होता. शोभायात्रेतील मुख्य लक्ष ठरली. शोभा यात्रेतील श्रीरामाच्या जयघोषाने गेल्या दोन दिवसापासून श्रीराम प्राण प्रतिष्ठापना पार्श्वभूमी गेल्या दोन दिवसापासून शोभायात्रा मार्गावर टँकरने पाणी शिंपडून व गाव झाडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. बोरगाव अंबाडा येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात शोभायात्रा विसर्जित करण्यात आली होती. दरम्यान श्रीराम प्रभू ची महाआरती करण्यात आली होती. प्रसादा करिता पाच हजार बुंदीचे लाडू दयाराम शेवाणे व रामेश्वर कुटे त्यांनी उपलब्ध करून दिले होते. या ऐतिहासिक कार्याच्या यशस्वी करिता प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांचे मंडळाचे अध्यक्ष अरुण शेवाणे यांनी जाहीर आभार व्यक्त केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!