spot_img

जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचा थरार;यंदाचा प्रहार श्री ठरला सर्वेश साहू

जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचा थरार;यंदाचा प्रहार श्री ठरला सर्वेश साहू

■प्रहार जनशक्ती पक्षाचे आयोजन

■मिररवृत्त
■अमरावती

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रतीक गोंडाने व सुमित कुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) येथे पार पडली. यामध्ये स्थानिक साई जिम येथील सर्वेश साहू तसेच क्रेझ जिम मधील सोहेल खान प्रहार श्री २०२४ चे मानकरी ठरले.त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
बॉडी बिल्डींग स्पर्धेदरम्यान अनेक पैलवानांनी सहभाग घेऊन आपल्या पिळदार शरीराने प्रशिक्षकांसह प्रेक्षकांनाही प्रभावित केले. यावेळी प्रशिक्षक म्हणून विकास पांडे,बबलू सोनोने, संतोष कुकडे, नागेश डोंगरे, राजेश विजयकर, निलेश सवई,आनंद लुंगीकर, अल्ताफ जावेद, चेतन वानखडे यांनी काम पाहिले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक तथा महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या माध्यमातून युवांना खेळाची तसेच करियर करण्याची संधी मिळेल. आगामी काळात प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात युवांसाठी मोठं मोठे स्पर्धेचे आयोजन करून त्यांना देशाचे, जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे नाव लौकिक करण्याची प्रेरणा मिळेल. प्रहार श्री २०२४ च्या माध्यमातून स्पर्धकांना आपली कला सादर करता आली आहे. समोरची याच प्रकारे बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात येईल. अमरावती जिल्ह्यातील युवांना देश पातळीवर काम करण्याची संधी मिळेल. हा उद्देश प्रहार जनशक्ती पक्षाचा असल्याचे महानगर प्रमुख बंटी रामटेके म्हणाले.
यावेळी प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू वसू महाराज, महानगर प्रमुख बंटी रामटेके, संपर्क प्रमुख गोलू पाटील, जिल्हा प्रमुख शेख अकबर, शहर संघटक श्याम इंगळे, अभिजित गोंडाने, सुधीर मानके, रावसाहेब गोंडाने, प्रतीक गोंडाने, सुमित कुमरे, ऋषभ मोहोड, मनीष पवार, शेषराव धुळे, विक्रम जाधव, अजय तायडे, कुणाल खंडारे, सचिन सवई, अमन गौरवे आदी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!