spot_img

डॉ.मिलिंद बारहाते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी , विद्यापीठाचे नववे कुलगुरु म्हणून स्वीकारणार पदभार

डॉ.मिलिंद बारहाते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

विद्यापीठाचे नववे कुलगुरु म्हणून स्वीकारणार पदभार

◆मिररवृत्त
◆अमरावती

राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज नागपूर येथील सी.पी.अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद अरविंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे तर डॉ.विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली.डॉ विजय फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे वरिष्ठ प्राध्यापक असून ते भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख होते.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नववे कुलगुरू म्हणून डॉ. मिलिंद बारहाते हे प्रभारी कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.डॉ.मिलिंद बारहाते यांची कुलगुरू पदी निवड झाल्याबद्दल संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, प्र कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विविध प्राधिकरणीचे सदस्य, प्राचार्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.डॉ. मिलिंद बारहाते हे सी.पी. अँड बेरार महाविद्यालय नागपूर येथे 2010 पासून प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर त्यांनी राज्यपाल नॉमित सदस्य म्हणून 2016 ते 2022 या कालावधीमध्ये कार्य केले आहे.

‘राज्यपाल बैस यांनी डॉ सुनील गंगाधर भिरुड यांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर नियुक्ती केली आहे. डॉ भिरुड हे वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत संगणक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागात प्राध्यापक पदावर काम करीत आहेत. सर्व कुलगुरुंची नियुक्ती ते पदभार स्वीकारल्याचे दिनांकापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा संबंधित कुलगुरु वयाची ६५ वर्षे पूर्ण करीपर्यंत – यापैकी जे अगोदर असेल त्या दिनांकापर्यंत – करण्यात आली आह’

‘संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी यापूर्वी स्व. डॉ. के.जी.देशमुख,डॉ.गणेश पाटील,स्व.डॉ. एस.टी.देशमुख, डॉ.सुधीर पाटील,डॉ.कमल सिंह, डॉ.मोहन खेडकर, डॉ.मुरलीधर चांदेकर आणि स्व.डॉ.दिलीप मालखेडे यांनी कुलगुरू पदाची सूत्रे यशस्वीरित्या सांभाळली आहेत’

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!