spot_img

25 जानेवारी रोजी अमरावतीत भव्य विजयग्रंथ सामूहिक पारायण सोहळा

25 जानेवारी रोजी अमरावतीत भव्य विजयग्रंथ सामूहिक पारायण सोहळा

◆हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती महोत्सवानिमित्त शिवसेनेचे आयोजन

◆मिररवृत्त
◆अमरावती

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्त आयोजित जयंती महोत्सवात अमरावती जिल्हा शिवसेना शाखेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 25 जानेवारी रोजी अंबानगरी अमरावतीत भव्य दिव्य असा विजयग्रंथ सामूहिक पारायण सोहळा होणार आहे .
शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या पुढाकारातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचा प्रारंभ 25 जानेवारी रोजी विजय ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्याने होणार असून साईनगर, बेनाम चौक स्थित प्रांगणात हा भव्य दिव्य पारायण सोहळा होणार आहे. 25 जानेवारी रोजी रोजी सकाळी सात वाजता सामूहिक पारायण वाचन सोहळ्यात सुरुवात होऊन ते दुपारी तीन वाजेपर्यंत चालणार आहे .श्री गुरुपुष्याच्या योगावर होणाऱ्या सोहळ्यात पुणे येथील डॉक्टर गजानन खासनीस हे व्यासपीठावरून पारायण वाचन करणार आहे.दुपारी चार वाजता महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होईल अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकारे पत्रकाद्वारे दिली आहे.
सदर विजय ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्यात हजारो अमरावतीकर गजानन भक्त सहभागी होऊन पारायण वाचन करणार आहे. तरी भाविक भक्तांनी सामूहिक पारायण सोहळ्यात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केले आहे .

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!