spot_img

गुरुकुंज आणि वलगाव येथील वृद्धाश्रमात कपडे व फराळ वाटप,स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्य शिवसेनेचा उपक्रम

गुरुकुंज आणि वलगाव येथील वृद्धाश्रमात कपडे व फराळ वाटप

◆स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्य शिवसेनेचा उपक्रम

◆ वृद्ध मातापित्यांना भरवला प्रेमाचा घास

◆अमरावती

हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने मंगळवारी गुरुकुंज मोझरी आणि वलगाव येथील येथील वृद्धाश्रमात कपडे आणि फराळ वाटप करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या उपक्रमाने वृद्ध मातापित्यांनी समाधान व्यक्त केले.
राजकारणासोबत समाजकारणावर भर देणाऱ्या शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची शृंखला सुरू आहे.स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्य जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांच्या नेतृत्वात सकाळी गुरुकुंज मोझरी व वलगाव येथील वृद्धाश्रमात जाऊन तेथील सर्व वृद्ध मातापित्यांना फराळचा प्रेमाने घास भरवत सर्वांना कपडे वाटप करून सामाजिक ऋण पार पाडले. यावेळी सर्व वृद्ध मातापित्यांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले व अरुण पडोळे यांना आशीर्वाद दिले.
यावेळी प्रामुख्याने युवासेना जिल्हाप्रमुख प्रवीण दिधाते, महिला आघाडी जिल्हाप्रमुख .नमिता तिवारी,रेखा खारोडे, सारिका जयस्वाल, शिवसेना तिवसा तालुकाप्रमुख दीपक खैरकर, चांदूर रेल्वे शहर प्रमुख गोलू यादव, उपजिल्हाप्रमुख गुणवंत हरणे,युवा सेना जिल्हा समन्वयक अक्षय पवार, विधानसभा अध्यक्ष शुभम परळीकर,प्रथमेश बोबडे ,राजेश माहुरे, चंदू दारोकार, युवा सेना विधानसभा अध्यक्ष अक्षय चव्हाण, दिनेश पावडे,युवासेना उपशहर प्रमुख मोंटी गोले व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!