spot_img

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

◆मिररवृत्त
◆अमरावती –

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत शिवाजी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित या सोहळ्याला माजी राज्यमंत्री व नेताजी स्मारक समितीचे अध्यक्ष सुरेंद्र भुयार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य सुरेशदादा खोटरे, प्रा.सुभाषराव बनसोड, माजी उपाध्यक्ष महादेवराव भुईभार स्वीकृत सदस्य तथा डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप बँकेचे अध्यक्ष नरेशचंद्र पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. नेताजी स्मारक समितीचे अध्यक्ष सुरेंद्र भुयार यांनी आपल्या भाषणातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यावर प्रकाश टाकला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख व नेताजी यांच्यातील स्नेह संबंधावर प्रकाश टाकला. व त्यांच्या कार्याचेही स्मरण वक्त्यांनी आपल्या भाषणातून केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र बोस, आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन डॉ.पंकज वानखडे यांनी तर कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.दिपाली भारसाकळे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले.प्रा.अतुल डांगे यांनी आभार मानले.कार्यक्रमाला संस्थेच्या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!