spot_img

वर्षा भटकर रा.कॉ.च्या महिला शहर अध्यक्षपदी

वर्षा भटकर रा.कॉ.च्या महिला शहर अध्यक्षपदी

◆मिररवृत्त
◆अमरावती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या वर्षा मंगेश भटकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी नुकतीच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार , जयंतराव पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा मंगेश भटकर यांची अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण व कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी वर्षा भटकर यांचा सातत्याने प्रयत्न असतो. पदवीधर विभागाच्या सुद्धा त्या पदाधिकारी असल्याने यापूर्वी पदवीधर वर्गाला सुद्धा त्यांनी प्रामुख्याने पक्षात स्थान दिले होते.
जिल्ह्यात गोर गरीब ,शेतकरी , रुग्णांच्या समस्या, लोकांचे विविध कामे करून त्याना तात्काळ मदत उपलब्ध करून देणे यासाठी वर्षा भटकर यांचा प्रयत्न असतो.त्यांच्या प्रामाणिक कार्याची पावती म्हणून पक्षाच्या वतीने ही महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे,वसुधा देशमुख,गणेश राय,वेदप्रकाश आर्या,प्रा.हेमंत देशमुख,विजय हावरे,मन्सूर भाई,राजेंद्र चिंचमलातपुरे ,डॉ रोशन अर्डक, नितीन राऊत,रोशन कडु ,विनेश आडतीया, धनंजय तट्टे, वर्षा गतफने यांनी शुभेच्छा दिल्या असून जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!