spot_img

डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे 11 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे 11 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

■यशाची परंपरा कायम

■मिररवृत्त
■अमरावती

श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे ११ विद्यार्थी यावर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आले आहे. डॉ.पंजाबराव देशमुख विधि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखल्यामुळे महाविद्यालयाचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
येथील डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सत्र 2022 -23 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. पाच वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमात एकूण पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पाचही मेरिट हे डॉ.पंजाबराव देशमुख विधि महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे. यामध्ये विद्यापीठातून प्रथम येण्याचा बहुमान संकेत इंगळे यांनी पटकाविला.तर द्वितीय आकांक्षा असणारे, तृतीय अरिहंत कोठारी ,चौथा चैतन्य अग्रवाल तर पाचवा क्रमांक ओमकार देशपांडे यांनी पटकावला आहे. याच महाविद्यालयाच्या एल.एल. एम अभ्यासक्रमातील चार विद्यार्थ्यांनी देखील गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळवला आहे.यामध्ये विद्यापीठ गुणवत्ता यादीत गायत्री जगताप हिने दुसरा क्रमांक पटकावला असून अफरोज खान यांनी तृतीय तर रक्षा चोरडिया यांनी चौथा क्रमांक आणि पिंकी जगलाल यांनी पाचवा क्रमांक मिळविला आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख विधि महाविद्यालयाच्या एलएलबी तीन वर्षी अभ्यासक्रमांमध्ये दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून यामध्ये महाविद्यालयाची आनंदा आचार्य यांनी पाचवा तर विशाखा बीडवाई हिने सातवा क्रमांक प्राप्त करून यश मिळविले आहे.
या यशाबद्दल प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!