विदर्भस्तरीय सायकलिंग स्पर्धेत श्री इटोले तृतीय क्रमांकाचा मानकरी
■मिररवृत्त
■अमरावती
अमरावतीमध्ये आयोजित विदर्भस्तरीय सायकलींग स्पर्धेत श्री नंदकिशोर इटोले यांनी तृतीय क्रमांक मिळवीत उत्कृष्ट सायकलपटूचा पुरस्कार पटकाविला .
श्री नंदकिशोर इटोले हा समर्थ हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत असून सायकलींचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता त्याने हे यश संपादन केले आहे . अमरावती सायकलींग असोसिएशन द्वारा आयोजित विदर्भस्तरीय सायकलींग स्पर्धेत बारा वर्षा आतील गटात श्री नंदकिशोर इटोले याने 15 किमी अंतर 28.33 मिनिटात पूर्ण करीत तृतीय क्रमांक मिळविला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्याला रोख दोन हजार रुपये ,मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .श्री नंदकिशोर इटोले याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि वर्गशिक्षकांना दिले असून त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.