नवोपक्रम स्पर्धा 2023-24, चा निकाल घोषित
अर्चना मेश्राम ,सुधीर केने ,श्रीनाथ वानखडे ,डॉ. सुचिता पाटेकर प्रथम
■विभागीय नवोपक्रम स्पर्धा,16 जानेवारीला डायट मध्ये पारितोषिक वितरण
■मिररवृत्त
■अमरावती
राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2023 -24 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा अमरावती जिल्हा व विभाग स्तरावरील निकाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांनी नुकतेच जाहीर केला आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक गटातून अर्चना मेश्राम, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गटातून सुधीर केने ,विषय सहाय्यक विषय साधनव्यक्ती विशेष शिक्षक व ग्रंथपाल गटातून श्रीनाथ वानखडे तर अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी गटातून डॉ. सुचिता पाटेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
नवोपक्रम स्पर्धेच्या जिल्हा व विभाग स्तरावरील गुणवत्ता प्राप्त स्पर्धकांची यादी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने घोषित केली आहे .त्यामध्ये प्राथमिक गटातून जि प प्राथमीक शाळा टोली ,ता.धारणी येथील अर्चना यशवंत मेश्राम यांनी प्रथम , जि प कन्या शाळा अमरावती येथील वीरेंद्र अज्ञानसिंग ब्राह्मण यांनी द्वितीय, मनपा प्राथमिक मराठी शाळा निंभोरा येथील गोपाल नारायणराव अभ्यंकर यांनी तृतीय तर जि प शाळा बऱ्हाणपूर तालुका मोर्शी येथील डॉ. निलेश रामभाऊ इंगोले यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मल्हारा येथील श्रीकृष्ण महादेव उघडे व जिल्हा परिषद शाळा आडगाव खाडे तालुका अंजनगाव येथील कांचन दादाराव भांगे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय मालखेड रेल्वे येथील सुधीर पंजाबराव केणे यांनी प्रथम ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय पिंपरी पूर्ण तालुका चांदूरबाजार येथील श्रीकांत गंगाधर निकम यांनी द्वितीय ,जनता गर्ल्स हायस्कूल शेंदूरजना घाट तालुका वरुड येथील अतुल रमेशराव पडोळे यांनी तृतीय तर बाबाराव ढवळे विद्यालय खराळा तालुका चांदूरबाजार येथील कु. शुभांगी सवई यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला.
विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती ,विशेष शिक्षक व ग्रंथपाल या चौथ्या गटातून गटसाधन केंद्र चांदूर रेल्वे येथील विषय साधन व्यक्ती श्रीनाथ साहेबरावजी वानखडे यांनी प्रथम, गटसाधन केंद्र भातकुली येथील मीनाक्षी पंडित खतरमोल यांनी द्वितीय, गटसाधन केंद्र वाशिम येथील विशेष शिक्षक स्वाती राजेंद्र नाचवणे यांनी तृतीय ,गटसाधन केंद्र मानोरा येथील समावेशित तज्ञ मोतीराम तुकाराम जाधव यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला .गटसाधन केंद्र मेहकर येथील विषय साधन व्यक्ती नीता श्रीधरराव देशमुख यांनी पाचवा तर गटसाधन केंद्र वाशिम येथील स्वाती हरीकिसन ढोबळे यांना व गटसाधन केंद्र मानोरा येथील विषय साधनव्यक्ती धनराज माजी मेहल्डे यांना उत्तेजनार्थ बक्षीस घोषित करण्यात आले आहे.
अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी गटातून माध्यमिक शिक्षणाधिकारी जि प अकोला डॉ. सुचिता आनंद पाटेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पंचायत समिती उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शन वाढ यांनी द्वितीय, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथील डॉ. मधुमती सांगळे यांनी तृतीय, केंद्रप्रमुख वाशिम येथील नामदेव पांडुरंग सरदार यांनी चतुर्थ ,केंद्रप्रमुख वाशिम आनंद संभाजी सुतार यांनी पाचवा तर केंद्रप्रमुख अशोक सदाशिवराव महल्ले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक घोषित करण्यात आले आहे.
‘विजयी स्पर्धकांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती येथे 16 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पारितोषिक वितरण प्रादेशिक विद्या प्राधिकरण तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती येथे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती प्रेमला खरटमोल यांनी दिली’