spot_img

बडनेरा येथे रंगणार प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा ,हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती महोत्सवानिमित्त शिवसेनेचे आयोजन

बडनेरा येथे रंगणार प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा

■हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती महोत्सवानिमित्त शिवसेनेचे आयोजन

■मिररवृत्त
■अमरावती

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती महोत्सव शिवसेना अमरावती जिल्हा शाखेतर्फे साजरा करण्यात येत असून या महोत्सव अंतर्गत बडनेरा येथे रात्रकालीन प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या पुढाकारातून आयोजित या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन 10 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता बडनेरा जुनी वस्ती स्थित चमन नगर ग्राउंड येथे होणार आहे. 20 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेत विदर्भातील तसेच अमरावती जिल्ह्यातील नामवंत संघ व खेळाडू सहभागी होत आहे .बडनेरा येथील नवाब ग्रुप या स्पर्धेचे नियोजन करीत असून कामगार शक्ती सेनेचे विदर्भ अध्यक्ष अक्रम पठाण, मो .शारीक पहेलवान ,शाकीर वेल्डर यांच्या मार्गदर्शनात नवाब भाई ,अजहर भाई ,मो शहाज ,अ. अजहर, निलेश सावळे ,शाहरुख हुसेन ,राजू अक्कलवार, शोएब खान ,कुचीन कैतवास ,मोहम्मद शहाज ,फराहन बेग,आदी परिश्रम घेत आहे .

■आकर्षक बक्षिसांची लयलूट■

दहा दिवस चालणाऱ्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणाऱ्या संघास शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्याकडून 21000 रुपये रोख व मानचिन्ह तसेच उपविजेत्या संघास शोएब भाई कडून रोख 11000 व मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या संघास राहील मेमन यांच्याकडून सात हजार रुपये रोख व मानचिन्ह देण्यात येणार आहे .सोबतच मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच ,बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन ,बेस्ट कॅचर यांना प्रत्येकी दोन हजार रुपये रोख आणि मानचिन्ह देण्यात येणार आहे .सोबतच आकर्षक बक्षिसांची लय लुट खेळाडूंवर करण्यात येणार असून या स्पर्धेचा अमरावती व बडनेरा शहरातील क्रिकेट प्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे व नवाब ग्रुप यांनी संयुक्तपणे केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!