spot_img

लोकसभेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर राहिल्यास आजाद समाज पार्टीचा पाठिंबा ,आझाद समाज पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मनीष साठे यांची घोषणा

लोकसभेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर राहिल्यास आजाद समाज पार्टीचा पाठिंबा

■आझाद समाज पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मनीष साठे यांची घोषणा

■मिररवृत्त
■अमरावती

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभेचे उमेदवार राहिल्यास आझाद समाज पार्टीचा त्यांना सर्वतोपरीने पाठिंबा राहणार असल्याची घोषणा आजाद समाज पार्टी प्रदेश सरचिटणीस मनीष साठे यांनी रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा महानगर कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केली.
रिपब्लिकन सेना जिल्हा व महानगर कार्यालयाचे उदघाटन यशोदा नगर नंबर २,मिनी बायपास येथे आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे अध्यक्ष ज्येष्ठविधीज्ञ पी.एस. खडसे, रिपब्लिकन पक्ष (खोरीपा)चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.गोपीचंद मेश्राम,रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विनायक दुधे, विभागीय महासचिव प्रा.सतीश सियाले,जिल्हाध्यक्ष अनिल बरडे,महानगर अध्यक्ष किशोर पालेकर, महानगर महासचिव माजी नगरसेवक साहेबराव मेश्राम,महानगर महिला अध्यक्ष आम्रपाली वरघट,शहर सचिव सोनू वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आनंदराज आंबेडकर यांच्यासह मान्यवरांनी फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन केले. मनीष साठे यांना आनंदराज आंबेडकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आनंदराज आंबेडकर यांचे आझाद समाज पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी आझाद समाज पार्टीचे प्रदेश प्रवक्ता किरण गुळदे, जिल्हाध्यक्ष सनी चव्हाण जिल्हा संघटक अनिल लक्ष्मण चाफळकर, प्रवीण सरोदे,नानासाहेब धुळे, संकेत यादव,रवी हजारे, बाळू ढोके, संतोष यादव, छाया हरणे, वंदना थोरात, प्रज्ञा दांडगे,संजू अंबरचते, जंजीर सिंग टाक, धम्मपाल पिलावंत, भगवान दांडेकर, राहुल चोपडे, संजू गडलिंग,वासुदेव पात्रे, रवी फुले, नंदू चोपडे,यांच्यासह आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

●एकत्र येऊन जातीवाद्यांना सत्तेतून हद्दपार करू -आनंदराज आंबेडकर●

शहर,जिल्हा कार्यालयातून गोरगरीब वंचितांच्या समस्या सोडविण्यात यावे.पक्ष शेवटच्या माणसापर्यंत जिल्हाभरात पोहोचावा संविधानाला मानणारा वर्ग एकत्र आल्यास जातीवाद्यांना सत्तेतून हद्दपार करू संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!