spot_img

रोमा बजाज यांचा भाजप महिला मोर्चातर्फे सत्कार,डॉ.गंगा खारकर यांचा पुढाकार

रोमा बजाज यांचा भाजप महिला मोर्चातर्फे सत्कार

■डॉ.गंगा खारकर यांचा पुढाकार
■मिररवृत्त

■अमरावती.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने राजापेठ येथील शहर भाजपा कार्यालयात भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा गंगा खारकर यांच्या पुढाकाराने डॉ.रोमा राजेश बजाज यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सरकारने एका सिंधी महिलेचा पहिल्यांदा अहिल्या देवी होळकर पुरस्कारानेसन्मान केला. एवढेच नाही तर डॉ.रोमा राजेश बजाज यांची महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.डॉ.रोमा बजाज, शहर उपाध्यक्षा यांच्या सत्कार कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस रश्मी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय जनता महिला मोर्चाचे. कार्यक्रमाला सुरेखा लुंगारे, राधा कुरील, अनिता राज, छाया आंबेकर, लविन हर्ष, शितल वाघमारे यांच्यासह विविध अधिकारी व सदस्य उपस्थित होते. डॉ.रोमा बजाज यांनी भाजप महिला मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. डॉ. रोमा बजाज या भारतीय सिंधू सभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, आयएनओच्या शहर सचिव, सिंधी महिला समाज अमरावतीच्या अध्यक्षा, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या आणि पोलीस शांतता व महिला सुरक्षा समिती सदस्य व बहुउद्देशीय रक्तदान समिती अध्यक्षा आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!