spot_img

वाठोडा शुक्लेश्वर येथे पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात ,जेष्ठ पत्रकारांसह नागरिकांचीही उपस्थिती

वाठोडा शुक्लेश्वर येथे पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात

■जेष्ठ पत्रकारांसह नागरिकांचीही उपस्थिती

■मिररवृत्त
■वाठोडा शुक्लेश्वर

भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे पत्रकार दिनानिमित्य पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शांतता समिती पोलीस स्टेशन खोलापूर व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात आला.कार्यक्रमाला पत्रकारांसह नागरिकांची देखील उपस्थिती होती.
मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.गावातील प्रथम नागरिक सरपंच मोहम्मद रिजवान यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले , कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार ईश्वर वर्गे,पत्रकार विजय ऋषी,पोलीस पाटील विनोद बागडे,अमोल महात्मे,भा. बा.काळे यांची प्रमुख उपस्थिती होती
विजय ऋषी यांनी आजच्या पत्रकारिता यावर मार्गदर्शन करून प्रामाणिक पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधवांचा सत्कार केला.
गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार गंगाधरराव घुरडे, गजानन खोपे, दिपक पिंपळे, संजय तल्हार,दिनेश खेडकर,धनराज खर्चान,विजय ऋषी,नितीन धोटे, रवींद्र कावरे,दिलीप ढोके,सुनील चिमणकर,रामेश्वर शेवतकर आदी पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला मातोश्री अनुसया विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचे सहकार्य लाभले,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल जवंजाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन अब्दुल कयूम यांनी मानले.यावेळी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाचगाडे,रवींद्र धरमठोक,माजी सैनिक जगदीशराव चांदुरकर, तलाठी संजय पवार, कोतवाल अभिजीत मकेश्वर, संदीप मोरे, आशिष बेतारिया, विकास वाठ, अब्दुल रज्जाक दिल भारतीय, जयकुमार गवई,रमेश थोरात,जानराव थोरात,संजय कातडे,शरद केवतकर,शंकरराव मकेश्वर,शमू भाई,जितेंद्र रसे,सुरेश जांभे, यांच्यासह अंगणवाडी सेविका सहसेविका आशा वर्कर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

‘पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून चोवीसतास
काम करणारा,गोरगरीब जनतेला न्याय हक्कासाठी सतत त्याने लढणारा पत्रकारांच्या लेखणी मध्ये वेगळी शक्ती आहे,पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यात यावे,तात्काळ शासनाने पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यात यावा असे मत पत्रकार दिनाच्या कार्यक्रमादरम्यान रमेश थोरात यांनी व्यक्त केले.’

समाजामध्ये वावरत असताना मोठ्या प्रमाणात पत्रकारांना अडचणी येतात आणि कुटुंबाला बाजूला ठेवून ते पत्रकारिता करतात.वेळ प्रसंग आला तर अर्ध्या रात्री बातमीसाठी धावपळ करावी लागते अशा परिस्थितीत पत्रकारांचा सन्मान करणे आपण सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.

◆स्नेहल जवंजाळ बँक मित्र◆

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!