spot_img

प्रा.इंगळे,राठोड,पटेल यांचा पोलीस आयुक्तांच्या वतीने सन्मान

प्रा.इंगळे,राठोड,पटेल यांचा पोलीस आयुक्तांच्या वतीने सन्मान

नांदगाव पेठ/प्रतिनिधी

सण, उत्सवांमध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी पोलिसांना सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा पोलीस आयुक्त नाविनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.प्रशस्तीपत्र आणि पाठीवरती कौतुकाची थाप देऊन पोलीस वर्धापन दिन कार्यक्रमात नांदगाव पेठ मधील प्रा. मोरेश्वर इंगळे, सत्यजित राठोड, राजीक पटेल यांचा यावेळी सन्मान केला.
गणेशोत्सव,नवदुर्गोत्सव,महापुरुषांचे जयंतीउत्सव तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न असतात मात्र पोलिसांना सहकार्य करण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा देखील तेवढाच सहभाग असतो.त्यामुळे पोलिसांना सातत्याने प्रामाणिक मदत करणाऱ्या प्रा. मोरेश्वर इंगळे, सत्यजित राठोड व राजीक पटेल यांचा पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला यावेळी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यांची देखील प्रामुख्याने उपस्थिती होती.
पोलीस वर्धापन दिन कार्यक्रमात उत्कृष्ट गणेशोत्सव व नवदुर्गोत्सव मंडळांना सुद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आले.यामध्ये महालक्ष्मीनगर गणेशोत्सव मंडळाला आयुक्तालयातून तिसरा पुरस्कार प्राप्त झाला तर बालदीपक गणेशोत्सव मंडळाला फ्रेजरपुरा विभागातून तिसरा पुरस्कार प्राप्त झाला तर सार्वजनिक कालीमाता नवरात्री महोत्सव या मंडळाला उत्कृष्ट दुर्गोत्सव मधून दुसरा पुरस्कार प्राप्त झाला.पुरस्कारप्राप्त मंडळांच्या अध्यक्षांना यावेळी प्रशस्तीपत्र देण्यात आले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!