spot_img

काशिनाथ भक्तांच्या संयमाचा बांध फुटला,अखेर मागणी असलेल्या जागेवर ‘काशिनाथ धाम’ चे भूमिपूजन

काशिनाथ भक्तांच्या संयमाचा बांध फुटला
■अखेर मागणी असलेल्या जागेवर काशिनाथ धाम चे भूमिपूजन
■अवघ्या काही तासात भक्तांनी उभा केला मंडप

■मिररवृत्त
■मंगेश तायडे/नांदगाव पेठ

ग्रामदैवत संत काशिनाथ बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्य हजारो भक्त नांदगाव पेठ येथे दर्शनासाठी येतात मात्र जागेअभावी भक्तांची होत असलेली गैरसोय बघता काशिनाथ भक्तांनी नाफडे पेट्रोल पंप जवळील जागेची मागणी करत गत वर्षी हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता परंतु वर्ष होऊनही शासन दखल घेत नसल्याने रविवारी भक्तांच्या संयमाचा बांध फुटला व भक्तांनी पडीक असलेल्या या जागेवरची अवघ्या काही तासात स्वच्छता करून या ठिकाणी काशिनाथ धाम चे भुजीपूजन करून पुण्यतिथी महोत्सवाचा मंडप देखील उभा केला.
गावाचे आराध्य दैवत संत काशिनाथ बाबा यांच्या १८ वा पुण्यतिथी महोत्सव १५ जानेवारी पासून प्रारंभ होणार आहे.१७ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या पुण्यतिथी महोत्सवानिमित्य विदर्भातून हजारो भक्तगण दर्शनासाठी याठिकाणी येत असतात.शिवाय संत, महंत, वारकरी यांची सुद्धा मोठी गर्दी असते मात्र एकच सभागृह असल्याने भक्त व मंडळींची याठिकाणी मोठी गैरसोय होते त्यामुळे नाफडे पेट्रोलपंप जवळील सर्व्हे नं.४८८ ही जागा भक्तनिवास व सभागृहासाठी देण्यात यावी अशी मागणी भक्तांच्या वतीने करण्यात आली होती.
३ एप्रिल २०२३ रोजी हजारो काशिनाथ भक्तांनी स्वयंस्फूर्तिने जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी पायदळ दिंडी मोर्चा काढून जागेचा विषय रेटून धरण्यात आला होता. खा. नवनीत राणा यांनी प्र.जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांचेसमक्ष जागेचा विषय निकाली काढण्याचेआश्वासन दिले होते मात्र आश्वासन हवेत विरल्याने तसेच काशिनाथ भक्तांचा संयम सुटल्याने रविवारी हजारो काशिनाथ भक्तांनी मागणी असलेल्या जागेवर भुजीपूजन करून पुण्यतिथी महोत्सवाचा मंडप देखील काही तासातच उभा केला.
१५ जानेवारी पासून प्रारंभ होणारे भागवत सप्ताहाचे कार्यक्रम आता काशिनाथ धाम येथे पार पडणार असुन याठिकाणी सभागृह व भक्तनिवास सुद्धा उभारण्यात येणार असल्याचा निर्धार भक्तांनी यावेळी केला.श्री.संत काशिनाथ बाबा संस्थांन नांदगाव पेठ चे विश्वस्त शिवराजसिंह राठोड, अध्यक्ष विपुल पालिवाल,संदीप यावले,जीवन दलाल महाराज सह असंख्य भाविक भक्त याठिकाणी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!