spot_img

सर्वांनी संविधानिक नितीमत्ताचे पालन करावे-प्रा.डॉ.रवींद्र मुंद्रे

सर्वांनी संविधानिक नितीमत्ताचे पालन करावे-प्रा.डॉ.रवींद्र मुंद्रे

■मिररवृत्त
■नेर परसोपंत

संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकारांतर्गत समानतेचा हक्क म्हणजे कायद्यापुढे सर्व समान अथवा कायद्याचे सर्वांना समान संरक्षण,स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य.शोषणा विरुद्धचा हक्क,धर्म स्वातंत्र्याचा हक्क आणि इतरही काही हक्क आपल्याला दिले आहेत.या सोबतच आपल्याला मूलभूत कर्तव्याची जाणीव पण करून दिली आहे.संविधान हे काही फक्त कायद्याचे सर्वोच्च पुस्तकच नाही तर आपली एक जीवन प्रणाली आहे.दैनंदिन जीवनात आपण कसे वागायला पाहिजे,आपली वर्तणूक कशी असायला पाहिजे याचा वस्तुपाठही देते.ही संवैधानिक नीतिमूल्ये आहेत,तेव्हा आपण सर्वांनी या संविधानिक नितीमुल्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ रवींद्र मुंद्रे यांनी केले.
राजमाता जिजाऊ महिला महाविद्यालय,नेर येथे संविधान दिन समारोह प्रसंगी समारोहाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले, संविधान निर्मितीची बाबासाहेब यांचे वर असलेली मोठी जबाबदारी आणि ती पार पाडत असताना त्यामुळे त्यांचे त्यांच्या प्रकृतीकडे झालेले दुर्लक्ष आणि त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या निर्मितीत तहानभूक विसरून आणि प्रकृतीकडे दुर्लक्ष करून घेतलेले अमाप कष्ट या बाबीमुळे त्यांचे आयुष्यमानही कमी झाले असे म्हटले तर वावगे होणार नाही.बाबासाहेबांनी अथक परिश्रमाने या देशाला दिलेले संविधान आणि संविधानिक मूल्य जोपासण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.विद्यार्थ्यांनी ही मूल्य आत्मसात करून स्वतः बरोबर देशाच्या उत्कर्षाला हातभार लावावा.संविधान आणि आपली कर्तव्य याबाबत अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
संविधान सभा व संविधान निर्मितीची प्रक्रिया कशा पद्धतीने झाली यामध्ये कोणकोणते अडथळे आले,संविधान सभेत बाबासाहेबांनी कसे समर्पक उत्तरे दिलीत या बद्दल चे विवेचन यादवराव आहाटे,माजी गट विकास अधिकारी यांनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक सचिव सुधाकर तलवारे यांनी तर आभार महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रुपाली कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. विनोद शेंडे, यांनी केले.संविधान दिन समारोहाच्या अध्यक्ष आणि संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती शुभांगी सदाशिवराव गावंडे ह्या होत्या.सभेला संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम तलवारे,कोषाध्यक्ष सविता तलवारे, शालिकराव गुल्हाने, नगरसेवक,रुपालीताई शिंदे, नगरसेवक,संस्थेचे सदस्य व माजी मुख्याध्यापक अरुण खडसे व महाविद्यालयाच्या परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवन विकास माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कणसे, सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!