spot_img

‘रील्स’च्या नादात जवाहर गेटची ट्रॅफिक जाम करून ‘छीचोरे चाळे’

‘रील्स’च्या नादात जवाहर गेटची ट्रॅफिक जाम करून ‘छीचोरे चाळे’

■लहान-थोरांसह कित्येक तरुणी-महिलाही लाईक्सच्या नशेत बेधुंद

■अनेकांवर गुन्हे दाखल होऊनही जीवघेणा-अश्लाघ्य नाद सुटेना

■मिररवृत्त

■अमरावती

शहरातील ऐतिहासिक जवाहर गेट, जेथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्याच जवाहर गेट चौकात एक जेष्ठ नागरिक चक्क वाहतूक जाम करून बेधुंद नाचतांना दिसला. या मार्गावरून जात असलेल्या वाहन चालक मुली-महिलांपुढेही तो आडवा येत विचित्र हातवारे व ‘छीचोरे चाळे’ करीत असतानांचा त्याचा ‘तो’ व्हिडीओ फेसबुक, व्हॅट्सऍप व इंस्टाग्राम या सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल आहे. ‘रील्स’च्या नादात असे ‘छीचोरे चाळे’ करणाऱ्यांचे जणू पीकच आले असून यापैकी अनेकांवर गुन्हे दाखल होऊनही त्यांचा लाईक्सच्या नशेचा नाद सुटत नसल्याचे दिसून येत आहे. लहान-थोरांसह कित्येक तरुणी-महिलाही या लाईक्सच्या नशेत बेधुंद झाल्याचे हजारो व्हिडीओ (रिल्स) चे प्रमाण दररोजच फेसबुक, व्हॅट्सऍप व इंस्टाग्राम या सोशल माध्यमांवर झपाट्याने वाढत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नवरात्र यात्रा महोत्सवात असाच एक तरुण रिल्स लाईक्सच्या नादात लग्नासाठी मुलगी शोधतानाचा व एका तरुणीचा साबणपुरा रोडवर भर चौकात स्टंट करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर एका रिल्स व्हिडिओत २ तरुणांनी पोलिसांविरोधात घाणेरड्या शब्दात रिल्स बनवल्याने शहर पोलिसांनी त्यांचेवर गुन्हे दाखल केले आहे. फेसबुक-इंस्टाग्रामवर तर अश्या अशे हजारो रिल्स उपलब्ध आहेत ज्यात तरुण-तरुणी लाईक्ससाठी वाट्टेल ते करतांना दिसतात. आजकाल भारतात अश्या शॉर्टेंज व्हिडिओला खूप मागणी आहे. याच शॉर्ट्ज व्हिडिओमुळे टिकटॉकला सर्वात जास्त पसंत केले जात होते. परंतु, टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर इंस्टाग्रामवर रील्स सुरू करण्यात आले. आता ही सुविधा फेसबुकवर सुद्धा सुरू करण्यात आली आहे. ज्यावर मिळणाऱ्या लाईक्सची संख्या वाढावी यासाठी अच्छे-अच्छे नवनवीन रिल्स बनवून ते सोशल माध्यमांवर प्रसारीत करीत आहेत. यापैकी कित्येक रिल्स या तर चक्क जीवघेण्या ठरल्या असून अनेकजण या अश्लाघ्य नादाचे नाहक बळी ठरले आहेत.

भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आल्यानंतर लोकांची करमणूक व्हावी यासाठी इंस्टाग्रामवर रिल्स सुरू करण्यात आले. परंतु, ज्यांचे इंस्टाग्रामवर अकाउंट नाही परंतु ते फेसबुक वापरतात त्यांनाही आता फेसबुकवर टिकटॉकसारखे शॉर्ट व्हिडिओ शेअर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सोशल मीडिया फेसबुकने तर आता फेसबुक रील्स फीचर अधिकृत पणे भारतात लाँच केले आहे. काही इंस्टाग्राम क्रिएटर्सला आपली रील्स थेट फेसबुकवर शेयर करण्याची सुविधा आहे. परंतु आता याच रिल्स अनेकांची डोकेदुखी, अनेकांसाठी जीवघेण्या तर तरुणाईला विचित्र वेड लावणाऱ्या ठरत आहेत हे उल्लेखनीय.

●काय आहे फेसबुक रील्स●
फेसबुकने टिकटॉक सारखे छोटे व्हिडिओजला रील्स नाव दिले आहे. फेसबुक रील्स एकदम इंस्टाग्राम रील्स सारखे आहे. या फीचर द्वारे युजर्स काही सेकंदाचे व्हिडिओज बनवून ते शेयर करू शकतात. हे व्हिडिओज न्यूज फीड मध्ये दिसतात. युजर्स फेसबुक म्यूझिक लायब्रेरीमधून कोणतेही साँग सिलेक्ट करून वेगवेगळे व्हिडिओ बनवून त्यांना वेगवेगवळे इफेक्ट देऊन एक टाइमर सेट करू शकतात. यात व्हिडिओच्या स्पीडही कमी करता येतात. या नवीन फीचर द्वारे फेसबुक भारतात शॉर्ट व्हिडिओच्या क्रेझला आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे जसे टिकटॉकने सुरू केले होते. याची सुरुवात भारतातूनच झाली असून इंस्टाग्राम लाईट ऍपवर सुद्धा हे फीचर सर्वात आधी भारतीय युजर्सला दिल्या गेले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!