spot_img

गोरगरीब रुग्णांना पंचतारांकित आरोग्य सुविधा देण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध-संजय गाते

गोरगरीब रुग्णांना पंचतारांकित आरोग्य सुविधा देण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध-संजय गाते

◆आयुष्यमान भारत योजनेमुळे रुग्णांना मोठा दिलासा
■महाआरोग्य शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने देशातील प्रत्येक गोरगरीब रुग्णाला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशात शंभरच्या वर वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली तर आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णाला उपचारासाठी पाच लक्ष रुपयांपर्यंत आर्थिक तरतूद करण्यात आली शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा अडीच लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली त्यामुळे गोरगरीब रुग्णांना पंचतारांकित आरोग्य सुविधा देण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केले.
रविराज देशमुख यांच्या वतीने नांदगाव पेठ येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की ८० टक्के समाजकारण करणे हा आमच्या मूळ उद्देश आहे.रविराज देशमुख यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबीर राबविण्यात आले.परिसरातील गोरगरीब रुग्णांसाठी निशुल्क तपासणी आणि औषधोपचार करून त्यांनी सामाजिक बांधिलकी निभावली आहे.रविराज देशमुख यांच्या या आरोग्यदायी उपक्रमाला त्यांनी भरभरभरून शुभेच्छा सुद्धा यावेळी दिल्या. शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जीवनविकास संस्था नागपूर तसेच भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी नांदगाव पेठ येथील ग्रामपंचायत प्रांगणात भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वतीने परिसरातील रुग्णांसाठी हे भव्य आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर उदघाटक म्हणून भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चे उपाध्यक्ष रविराज देशमुख,जेष्ठ भाजप कार्यकर्ते रमेश उपाध्याय,डॉ. ओमप्रकाश बजाज ,सुभाष अग्रवाल ,सुभाष श्रीखंडे,ग्रा.पं. सदस्य वंदना भटकर,वर्षा गाडगे, शालिनीताई मेघे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत गावंडे
जीवन आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ.जीवन जवंजाळ,रोटरी क्लब चे राजू वर्धे,डॉ. अश्विन रडके,पुंडलिक यादव,रुपेश लहाने,संजय पकडे,देविदास हिवे,सुबोध देशमुख आदींची उपस्थिती होती.
महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जेष्ठ भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार यांचा सत्कार सुद्धा याठिकाणी घेण्यात आला.या शिबिरात मेडिसिन, स्त्री रोग, अस्थीरोग, नेत्ररोग, बालरोग, दंतरोग,न्यूरॉलिजी, शल्य चिकित्सक, कान, नाक, घसा, मेंदू शस्त्रक्रिया (न्यूरो सर्जन),किडनी रोग तज्ञ, हृदयरोग चिकित्सक आदी व्याधींवर तज्ञ वैद्यकीय तज्ज्ञांनी तपासणी आणि उपचार केलेत. पंचक्रोशीतील हजारो रुग्णांनी यावेळी शिबिराचा लाभ घेतला.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी भाजप कार्यकर्ते सचिन इंगळे,अमोल व्यवहारे, अनुप भगत, अंकुश चौधरी, सुनील धर्मे, सुनील जवंजाळकर, गजानन तिजारे, मंगेश कापडे, पूजा राऊत, सचिन राऊत यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

●तिवसा विधानसभा मतदार संघात १२ महाआरोग्य शिबीरे●

तिवसा विधानसभा मतदार संघात तब्बल १२ महाआरोग्य रोगनिदान शिबिरे घेण्यात येणार असून यानिमित्ताने गोरगरीब वंचित रुग्णांची सेवा करण्याचा मानस रविराज देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!