spot_img

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ द्या

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ द्या

■अन्यथा बेमुदत अंन्नत्याग – मुकुंद पूनसे यांचा इशारा

■मोदी घरकुल योजनेतूनही भटक्या विमुक्त जातींना वगळले

■मिररवृत्त
■प्रदीप टेकाडे/चिंचखेड

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची अंमलबजावी प्रभावीपने होत नसल्याने तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातीलच लाभार्थी या योजनेच्या घरकुल लाभापासून वंचित असल्याचे दिसत आहे.तिवसा पंचायत समिती अंतर्गत २०१८ पासून जवळपास ३०० चे वर प्रस्ताव समाजकल्याण विभाग अमरावती यांच्या कडे मंजुरी व पुढील कार्यवाहीस्तव पाठवण्यात आले होते.परंतु सदर प्रस्ताव त्या ठिकाणी धूळखात पडून असल्याचे दिसत असून सदर योजनेवर शासना कडून निधीच उपलब्ध नसल्याचे समाजकल्याण विभागा कडून सांगण्यात येत आहे.त्यामुळे बरेच वर्षापासून पात्र लाभार्थी आजही आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहे.३० जुलै २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यशासनाच्या अखत्यारीत असलेल्या आदिवासीं विकास विभाग अंतर्गत ज्या २२ योजनेचा लाभ ST समाजाला दिला जातो तोच लाभ धनगर समाजाला मिळणार असल्याचे जाहीर केले होते त्याच धर्तीवर सरकारने धनगर समाजाचा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये समावेश करून पहिल्याच टप्प्यात दहा हजार (१०,०००) घरे बांधून देण्याची घोषणा केली होती.त्या मुळे काही प्रमाणात धनगर समाजामध्ये आनंदाचे वातावरण होते.परंतु बरेच वर्ष उलटून सुद्धा योजनेवर कवळीचाही निधी उपलब्ध नसल्याने तत्कालीन सरकारच्या घोषणा हवेतच विरल्याच्या दिसत आहे. त्यामुळे सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केल्याने सरकार विरोधात रोषनिर्माण झाला आहे. तर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत येणाऱ्या बंजारा, वंजारी यासह १७ प्रकारच्या जाती मधील जिल्यातील हजारो लाभार्थी योजनेच्या घरकुल पासून वंचित आहे.त्यात नुकतीच नव्याने जाहीर करण्यात आलेल्या इतर मागासवर्गीय मोदी घरकुल योजनेतून भटक्या विमुक्त जातींना वगळे असल्याने अनेक पात्र लाभार्थी घरकुल पासून वंचित आहे.त्यामुळे वणी ममदापूरचे माजी सरपंच मुकुंद पूनसे यांनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग अमरावती यांची भेट घेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने बरेच पात्र लाभार्थी आपल्या हक्काच्या घरकुलपासून वंचित असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.त्यामुळे तालुक्यातील बरेच कुटुंब आजही आपल्या मुलाबाळासह कुडाकाडीच्या घरात वास्तव्यास असलेल्याने सदर योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करून तालुक्यातील वंचित पात्र लाभार्थ्यांना तातडीने आपल्या हक्काच देण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे.अन्यथा कुठल्याहीक्षणी समाजकल्याण विभागाच्या कार्यालया समोर शेकडो लाभार्थ्यांना सोबत घेऊन अंन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेल्या निवेदनातून प्रशासनाला दिला आहे.

‘सदर योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी व पात्र लाभार्थ्यांना आपुल्या हक्काचे घर मिळावे याकरिता सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परंतु निगरगट्ट शासन आणि कुंभकर्ण झोपेत असलेल प्रशासन निव्वळ झोपेचं सोंग घेवून,पात्र लाभार्थ्यांना आपल्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवण्याच पाप करीत आहे.’

■सौ.रोशनी मुकुंद पूनसे उप सभापती पं.स.तिवसा

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!