spot_img

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, पत्नी ठार पती जखमी

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, पत्नी ठार पती जखमी

■पिंपळझिरा फाट्यावरील घटना

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

अमरावती वरून शेंदोळा येथे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नी ठार झाली तर पती गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान पिंपळझिरा फाट्यावर घडली. घटनेनंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले.हर्षा अनिल टापरे (३६) रा शेंदोळा (बु) असे घटनेतील मृत महिलेचे नाव आहे तर अनिल टापरे (४१) असे जखमीचे नाव आहे.
घटनेची सविस्तर हकीकत अशी की, अनिल टापरे व त्यांची पत्नी हर्षा दोघेही दुचाकी क्र. एम एच २७ बी.सी.७२३८ ने अमरावती येथून शेंदोळा येथे जात असतांना पिंपळझिरा फाट्यावर वळण घेत असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव आयशर ट्रक ने दुचाकीला जबर धडक दिली यामध्ये पती पत्नी दोघेही गंभीर जखमी झालेत.अपघातानंतर दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच हर्षा अनिल टापरे हीचा मृत्यू झाला तर पती अनिल टापरे यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!