spot_img

वैशाली गायकवाड उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित,डॉ.आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने मोठा सन्मान

वैशाली गायकवाड उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित

■डॉ.आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने मोठा सन्मान
■मिररवृत्त
■अमरावती

शासनाच्या विविध योजनांची वैशिष्ट्यपूर्ण अंमलबजावणी करून त्या योजनांचा खऱ्या गरजूंना लाभ मिळवून देणाऱ्या तसेच आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय करत ग्रामपंचायत सोनेगाव(आबाजी) सारख्या गावाला विविध पुरस्कार मिळवून देणाऱ्या ग्रामसेवक वैशाली गायकवाड यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकताच दिल्ली येथे त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
संविधान भवन दिल्ली येथे थाटात पार पडलेल्या या सन्मान सोहळ्याला सामाजिक न्याय मंत्री मंत्री रामदास आठवले, केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, आदीला फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. एस.आदी नारायणा,डॉ. आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजीव मेमन,मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य उर्वशी मित्तल,
सुरेखा लामतुरे आदी मान्यवर उपस्थित होते. वैशाली गायकवाड यांनी केलेल्या कार्याची दखल घेत तसेच त्यांच्या कार्याचा आढावा याठिकाणी ग्लोबल फाउंडेशनने उपस्थितांसमोर मांडला.
ग्रामीण भागात आपले कर्तव्य पार पडतांना शासनाच्या प्रत्येक योजनांना घरोघरी पोहचविण्यासाठी प्रामाणिक कार्य करणाऱ्या वैशाली गायकवाड यांचा उपस्थितांनी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन यावेळी यथोचित सत्कार केला.गायकवाड यांनी सोनेगाव आबाजी गावाला स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार, एमआरजिएस अंतर्गत ऑक्सिजन पार्क येथे ६०० वृक्ष लागवड, वैयक्तिक शौचालय बांधकाम, घरकुल योजना,९० टक्के कर वसुली, दलित वस्ती विकास,१५ व्या वित्त अयोग अंतर्गत सार्वजनिक शौचालय तसेच शालेय, आरोग्य, मागासवर्गीय विकासाच्या योजना आदींच्या मध्यानातून वेगळी ओळख दिली. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!