spot_img

अनिता नवले (जोल्हे) यांना उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार,दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान

अनिता नवले (जोल्हे) यांना उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार

■दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान
■मिररवृत्त

■अमरावती

तालुक्यातील नांदुरा (बु) ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवक अनिता नवले (जोल्हे) नुकताच उत्कृष्टग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील संविधान भवन येथे त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करून पुरस्कार बहाल करण्यात आला. अनिता नवले यांनी अनेक ग्रामपंचायतींना सेवा दिली असून त्याठिकाणी उत्कृष्ट व्यवस्थापन करत शासनाच्या विविधांगी योजनांना लोकाभिमुख करण्यात यश मिळविले.
त्यांच्या कार्याची दखल दिल्ली येथील ग्लोबल फाउंडेशनने घेतली असून नुकताच त्यांचा दिल्ली येथे सन्मान करण्यात आला. संविधान भवन येथे आयोजित या सत्कार समारंभाला सामाजिक न्याय मंत्री मंत्री रामदास आठवले, केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, आदीला फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. एस.आदी नारायणा,डॉ. आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजीव मेमन,मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य उर्वशी मित्तल,
सुरेखा लामतुरे आदी मान्यवरांच्या हस्ते अनिता नवले यांना सन्मानचिन्ह तसेच सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
अनिता नवले यांनी शासनाच्या योजनांना लोकाभिमुख करण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. अनेक ग्रामपंचायतींना शासनाचे पुरस्कार देखील मिळवून दिले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना त्यांनी सेवा दिली असून कर्तव्यदक्ष ग्रामसेवक म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.त्यांना उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार मिळल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!