spot_img

स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयाला नॅकचे ‘B++’ श्रेणीत मानांकन

स्व.दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयाला नॅकचे’B++’श्रेणीत मानांकन

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

स्व.दत्तात्रय पुसदकर शिक्षण संस्था,अमरावती द्वारा संचालित नांदगाव पेठ येथील स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय येथे बेंगलोर येथील नॅक समितीने दिनांक ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२३ रोजी भेट दिली होती. नांदगाव पेठ सारख्या ग्रामीण भागात असलेल्या या महाविद्यालयाला त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आवश्यक असलेल्या सर्व निकषांची पूर्तता करत नॅक समितीने ‘B++ (सी जी पी ए 2.83) हे मानांकन देउन या महाविद्यालयाला सन्मानित केले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील पाचही जिल्हयामधून ग्रामपंचायत क्षेत्रातील नॅक समिती द्वारे ‘B++’ हे उच्च मानांकन दर्जा मिळवणारे हे एकमेव महाविद्यालय ठरले आहे.
उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढीसाठी ‘राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती समिती’ (नॅक) ची स्थापना केंद्र सरकार द्वारे करण्यात आली असून, देशातील सर्व महाविद्यालयाना व विद्यापीठांना नॅक समिती कडून मूल्यांकन करून घेणे क्रमप्राप्त आहे. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सोयीसुविधा, व्यायामशाळा, ग्रंथालय, संगणकीकरण, एन.एस.एस. (राष्ट्रीय सेवा योजना), गुणवतापूर्ण शिक्षण व संशोधन सुविधा, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने महाविद्यालयाची तयारी यासोबतच सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने एड्स जनजागृती, सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण जनजागृती, मतदार जागृती, मानवी हक्क, संविधानिक मुद्द्यांची रुजवणुक, स्त्रीपुरुष समानता, महीला व बालकांचे शोषण व अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती विविध सामाजिक उपक्रम व प्रश्नाबाबत समितीने महाविद्यालयाचे मूल्यांकन करुन गुणदान करण्यात आले.
त्या आधारे महाविद्यालयास ‘बी ++’ श्रेणी प्रदान करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी, बेळगाव, कर्नाटक, येथील अर्थशास्त्र विभागाचे डीन डॉ. तलवार सबण्णा आणि मेंबर कॉर्डिनेटर म्हणून तिरुचनगोडे, तमिळनाडू येथील विद्या विकास कॉलेज ऑफ एज्युकेशन चे प्राचार्य डॉ. दिनेशकुमार रामामुर्थी यांनी महाविद्यालयाचे विविध निकषावर परिणामकारक मूल्यांकन करून अहवाल सादर केला. समितीने महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, माजी विद्यार्थी, पालक आणि नियमित विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला.
महाविद्यालयातील सर्व विभागांना भेटी देऊन सर्व उपक्रमावर बद्दल माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी भारतीय कला व संस्कृती या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यापुढे महाविद्यालयात आणखी चांगले व्यवसायाभिमुख कौशल्य आधारित असे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. तसेच पदव्युत्तर स्तरावर इतिहास, मराठी, डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग आणि बी कॉम हे नवीन अभ्यासक्रम पुढील वर्षी प्रस्तावित आहे. या दुसऱ्या फेरीची मानांकन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्व. दत्तात्रय पुसदकर शिक्षण संस्था अमरावती चे अध्यक्ष श्रीमती वृषालीताई पुसदकर, उपाध्यक्ष निदान बारस्कर, सचिव श्रीकृष्ण बाळापुरे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर हिवसे, सदस्य रेवन पुसदकर व संस्था कार्यकारिणीचे मार्गदर्शनात अधिक उच्च मानांकन मिळवण्यासाठी प्राचार्य डॉ. विजय दरणे यांच्या नेतृत्वात नॅक समन्वयक प्रा. डॉ. पंकज मोरे आणि महाविद्यालयाचे पूर्णवेळ प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वानी भरपूर मेहनत घेतली. महाविद्यालयाच्या या यशामध्ये स्व. दत्तात्रय पुसदकर शिक्षण संस्थेची संपूर्ण कार्यकारिणी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, माजी विद्यार्थी, पालक या सर्वाचे मार्गदर्शन आणि नियमित विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दरणे व अंतर्गत गुणवता कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. पंकज मोरे यांनी दिली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!