कल्याण नगर येथे शिवमहापुराण कथेस उत्साहात प्रारंभ
अश्वावरून काढली पोथीची मिरवणूक
टाळ मृदुंगाच्या तालात तल्लीन झाले भक्त
●मिररवृत्त
●अमरावती
परमहंस श्री संत बालयोगी गजानन बाबा यांच्या 63 व्या जन्मदिनानिमित्त कल्याण नगर येथे आयोजित शिव महापुराण कथेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.कथेच्या पहिल्या दिवशी मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात शिवमहापुराण पोथीची अश्वावरून मिरवणूक काढण्यात आली.टाळ मृदुंगाच्या तालावर भाविक भक्त फेर धरत भक्तीत तल्लीन झाले होते.
कल्याण नगर येथील परमहंस श्री संत बालयोगी गजानन बाबा कथा मंडप येथे सुरू झालेल्या शिव महापुराण कथेचे वाचन आचार्य गुरुवर्य सुधांशुजी महाराज यांच्या कृपा पात्र शिष्य रामाश्रय सुश्री रामप्रियाजी माई या करीत आहेत .४ डिसेंबर रोजी सकाळी तीर्थस्थापना व अभिषेक झाल्यानंतर शिवमहापुराण पोथीची अश्वावरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो भाविक भक्त सहभागी झाले होते. प्रत्येक चौकात भाविक भक्तांनी शिवमहापुराण पोथीस हारार्पण करीत पूजन केले आणि बालयोगी गजानन बाबा यांचा जयघोष केला.
11 डिसेंबर रोजी शिवमहापुराण कथेचा समारोप होणार असून या मिरवणूकीमध्ये श्री संत बालयोगी गजानन बाबा संस्थान कल्याण नगर अमरावतीचे पदाधिकारी तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे , सुधीर सूर्यवंशी व,प्रशांत वानखडे, रमेशभाऊ काठोळे,पराग गुडधे, विकास शेळके, संजय गव्हाळे उमेश सेवक वर्षा भोयर, मनीषा टेम्भारे, राजश्री जठाळे, जयश्री कुऱ्हेकर, प्रतिभा बोपशेट्टी, लक्ष्मी शर्मा, सारिका जयस्वाल,हरिहर इंगोले, शंकरराव पांडे, प्रदीप देशमुख, संजय गेडाम, विजय गुप्ता, केतन मसतकर, राहुल पवार, चंदू बारड, संजय काळे, अनिल चितळे, चंदन लोंढे, सुनील चितळे सुमित जयसिंगपूऱे पंकज पांडे विशाल भेंडे सुनील जगताप वैभव देशमुख संजय वाकडे
राहुल खंडार केतन मसतकर ठाकरे काका रोहन चितळे बंटी यादव अनुराग किल्लेकर गजानन तायडे रामावत महाराज यांचे सह शेकडो भाविक भक्त सहभागी झाले होते
3 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री विजय ग्रंथ पारायण सोहळा पार पडला. सुभदाताई मेटकर यांनी श्री विजय ग्रंथाचे वाचन केले. या सोहळ्यास परिसरातील शेकडो भाविक भक्त उपस्थित होते. याप्रसंगी महिला भविकांनी देखील पारायण केले
◆दिंड्यांचे गोल व उभे रिंगण◆
शिवमहापुराण कथा सोहळ्याचे औचित्य साधून कल्याणनगर येथून काढण्यात आलेल्या दिंडी सोहळ्याने अमरावतीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या दिंडी सोहळ्यात विदर्भातील नामांकित वारकरी सांप्रदायिक दिंड्यांनी सहभाग घेतला होता.अमरावती शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत सर्व दिंड्यांचे राजकमल चौकात गोल रिंगण आणि राजापेठ चौकात उभे रिंगण रंगले.प्रत्येक दिंडीमधील सहभागी वारकऱ्यांनी विविध भक्ती गीतांच्या व अभंगाच्या तालावर नृत्य सादर करीत एक वेगळीच रंगत आणली.यामध्ये अमरावती करांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभागी होत वारकऱ्यांचा उत्साह वाढविला. ठिकठिकाणी दिंड्यांचे स्वागत करण्यात आले, सामाजिक संस्था व संघटनांतर्फे दिंडीत सहभागी वारकऱ्यांची चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती.