spot_img

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या विजयाचा माहुली जहागीर येथे जल्लोष

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या विजयाचा माहुली जहागीर येथे जल्लोष

●गुलाल उधळून फटाक्यांची केली आतिषबाजी

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे भाजपने मिळविलेल्या दणदणीत यशश्रीनंतर या अभूतपूर्व विजयाचा भाजप जिल्हा सरचिटणीस विवेक गुल्हाने यांच्या वतीने माहुली जहागीर येथे जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या वतीने गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात निवडणूका पार पडल्या.३ डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीनंतर भारतीय जनता पक्षाने तीनही राज्यात सत्ता मिळवली असून देशभर हा विजयोत्सव साजरा करण्यात आला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस विवेक गुल्हाने यांच्या वतीने सुद्धा माहुली जहागीर येथे विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी विजयी उमेदवारांचे गुल्हाने यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या वतीने गावकऱ्यांना पेढे वाटण्यात आले.
यावेळी या विजयोत्सवामध्ये माजी जि.प. सदस्य भारती गेडाम,भाजप अमरावती ग्रामीणच्या महिला तालुकाध्यक्ष चित्रा बरगट, सुमन गणोरकर, विरेन्द्र लंगडे, ,सुनिल बिजवे, यादवराव लोमटे, मधुकरराव जावरे, हेमराज सपकाळ , विनायक यावले , अनिल खंडारे, ,राजु मनोहर, संजय धनसुईकर, मंगेश घोडे, उमेश लाड , रमेश इंगोले , रामु ढोले , मुकूंद बिजवे, सचिन खोपे , प्रविन वासनकर, नागेन्द्र तायडे, रवि चव्हान उपसरपंच (वाघोली) , राजेश बारबुद्धे, राजु फुरसडे, सुधीर जाधव कार्यकर्ते( केकतपुर), शुभम खत्री,रुषीकेश गुल्हाने , विशाल देवतळे , तेजस बान्ते , योगेश सपकाळ , राज बरगट , नरेश गेडाम , प्रशांत मेश्राम , रवि येवतकर ,अक्षय वणवे, अक्षय कल्हाने ,आकाश गुल्हाने यांचे सह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!