spot_img

आचारसंहिता लागू,महाराष्ट्रात 5 टप्प्यांत मतदान अमरावतीत दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल ला मतदान

आचारसंहिता लागू,महाराष्ट्रात 5 टप्प्यांत मतदान

◆अमरावतीत दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल ला मतदान

◆19 एप्रिल पहिला, 26 एप्रिल दुसरा, 7 मे तिसरा, 13 मे चौथा अन् 25 मे रोजी 5 व्या टप्प्याचे मतदान

◆4 जून रोजी मतमोजणी

◆मिररवृत्त

◆दिल्ली

लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. लोकसभा मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू, ज्ञानेश कुमार यांनी माहिती दिली. दरम्यान, देशभरात सात टप्प्यात हे मतदान होणार असून महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे.दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिल ला
अमरावतीत मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

◆काय म्हणाले निवडणूक आयुक्त◆

मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त एस.एस.सिंह आणि ज्ञानेश कुमारही हजर होते. 2024 2 वर्ष जगभरात नितटणकांचं असन जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी केले. सर्व जागांसाठी 4 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान होईल.

◆महाराष्ट्रात किती टप्प्यात मतदान?

देशातील 543 लोकसभा जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभा मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल

• पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

• दुसरा टप्पा 26 एप्रिल बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

• तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

• चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

• पाचवा टप्पा 20 मे धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

◆महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदार संघ◆

देशाच्या 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दरम्यान, 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप 303 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 11 एप्रिल ते 19 मे 2019 दरम्यान एकूण 7 टप्प्यांत या निवडणुकांमधून 17 लोकसभेमधील सर्व 543 खासदारांची निवड केली गेली. त्यापैकी 78 खासदार महिला आहेत. इकडे महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत.
महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. भाजपला 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 1, MIM 1 आणि अपक्ष 1 अशा जागा जिंकल्या होत्या. आता भाजप शिवसेना पूर्वीची युती तुटून नव्याने झाली, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत चित्र कसे असेल हे पाहणं महत्वाचं असेल.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!