spot_img

महिलांचा सन्मान करणे हीच माझी संस्कृती-खा.नवनीत राणा, नांदगाव पेठ येथे महिला शक्तीचा जागर

महिलांचा सन्मान करणे हीच माझी संस्कृती-खा.नवनीत राणा

◆नांदगाव पेठ येथे महिला शक्तीचा जागर

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

नारीशक्ती ही देशातील सर्वात मोठी शक्ती आहे, जग बद्लविण्याची धमक केवळ स्त्रियांमध्ये आहे चूल आणि मूल ही आजची परिस्थिती बदलवून नारीशक्ती देशात नावलौकिक करत आहे त्यामुळे जात,पात, धर्म, पंथ न बघता महिलांचा सन्मान करणे हीच माझी संस्कृती असल्याचे प्रतिपादन मावळत्या खा.नवनीत राणा यांनी नांदगाव पेठ येथील एका कार्यक्रमात केले. स्थानिक ग्रामपंचायत पटांगणात युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी महिलांशी संवाद साधतांना नवनीत राणा बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर खा.नवनीत राणा, आ. रवी राणा ग्रा.पं. सदस्य शिवराजसिंह राठोड, छत्रपती पटके,आशा चंदेल,ज्योती यावलीकर,अभय चंदेल, विपुल पालिवाल, राजेंद्र तुळे आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्ह्यात महिला खासदार असल्याने महिलांचे प्रश्न संसदेत मांडून महिलांना न्याय देता आला शिवाय जिल्ह्यातील महिला कोणतीही समस्या घेऊन एका महिला खासदाराला प्रत्यक्ष भेटू शकतात नाहीतर या आधी खासदारांना भेटणे तर दूरच महिलांना खासदार कोण आहे हे सुद्धा माहीत नव्हते. खासदार आणि विकासकामे यांचा दूरपर्यंत संबंध नव्हता असेही नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.
जिल्ह्याची खासदार असल्याने नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीत रेमंड सारखे मोठे उद्योग आणून येथील महिला पुरुषांना, युवकांना चांगला रोजगार देण्याचे कार्य मी केले नाहीतर आमच्या नणंद बाईंनी केवळ पैश्यासाठी एमआयडीसीमध्ये येणारे उद्योग परतून लावले एवढेच नाही तर रोजगाराच्या दृष्टीने मंत्री असतांना सुद्धा एकही रोजगारक्षम उद्योग नांदगाव पेठ मध्ये आणला नाही असा आरोप सुद्धा नाव घेता यशोमती ठाकूर यांच्यावर लावला.या सभेला महिला वर्गानी चांगलीच गर्दी केली होती. नवनीत राणा यांनी महिलांचे हळदी कुंकू सुद्धा यावेळी केले.
आ.रवी राणा यांनी सुद्धा यशोमती ठाकूर यांच्यावर तोफ डागत हनुमान चालीसा प्रकरणी नवनीत राणा १४ दिवस तुरूंगात असतांना तत्कालीन मंत्री यशोमती ठाकूर यांनी एका महिलेप्रति संवेदना न दाखवता याउलट त्यांच्याविरोधात प्रतिक्रिया दिल्याचा आरोप केला मात्र हनुमानाने सर्वांचा हिशोब चुकता करून सत्तेचा माज असणाऱ्यांना आणि हनुमान चालीसाचा विरोध करणाऱ्या सरकारला सत्तेवरून खाली खेचले त्यामुळे भविष्यात अश्या लोकप्रतिनिधीपासून महिलांनी सावध राहावे असा खोचक सल्ला सुद्धा रवी राणा यांनी उपस्थित महिलांना दिला.
नवनीत राणा यांच्या निधीतून सप्तरंग क्रीडा मंडळाला पाच लक्ष रुपयांचे मॅटीन यावेळी देण्यात आले.सप्तरंग क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नवनीत राणा यांचा शाल व प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार सुद्धा केला. यावेळी नांदगाव पेठ मधील असंख्य महिला व पुरुष सुद्धा या सभेला उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!