spot_img

ब्रेकिंग न्यूज!मृद व जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द , मंत्री संजय राठोड यांचे आदेश

ब्रेकिंग न्यूज!मृद व जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द

◆मंत्री संजय राठोड यांचे आदेश

◆मिररवृत्त

◆अमरावती

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या
वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.नांदगाव पेठ मधील ड्रीमलँड येथील एआरएन या परीक्षा केंद्रावर 20 आणि 21 फेब्रुवारीला विविध
पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती.यावेळी परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याच्या घटनेने एकच गोंधळ उडाला होता.या घटनेत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा
आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.त्यानंतर यांचे तीव्र पडसाद उमटत अनेकांनी याविषयी तक्रार दाखल करत हा प्रश्न लावून धरला
होता.परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये,तसेच परीक्षेबाबत विश्वासहर्ता कायम राहावी या उद्देशाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या बाबत राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
ड्रीमलँड येथील एआरएन या परीक्षा केंद्रावर मृद व जलसंधारण विभागाच्या राजपत्रित अधिकारी पदाचा पेपर सुरू असतांना विभागाच्या वर्ग दोन च्या अधिकाऱ्याने प्रवेश पत्रिकेवर उत्तरे लिहून ते यश कावरे नावाच्या परीक्षेला बसलेल्या उमेदवाराला दिले हा प्रकार शेजारच्या विद्यार्थ्याने बघितल्यावर त्या ठिकाणी गोंधळ झाला सुरू असतांना मृद आणि पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला,मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी लावून धरत
आंदोलनाचा इशारा दिला होता. मृद व जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियंता पदाकरिता ही परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेला राज्यात 52 हजार 690 विद्यार्थी बसले होते. तर सदर भरती प्रक्रिया ही टीसीएस मार्फत घेण्यात आली होती.मात्र या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्या करिता गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्र घेत आपली मागणी लावून धरली होती, सोबतच संबंधित विभागाला अनेक तक्रारी देखील दिल्या होत्या. परिणामी ही परीक्षा रद्द करण्याचे आदेश राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला दिले आहे.

◆परीक्षा नवी, पण पेपर फुटीचा पॅटर्न तोच- विजय वडेट्टीवार◆

पेपर फुटीच्या या प्रश्नावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया वर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला होता.त्यावेळी ते म्हणाले, WCD चा अमरावती येथील ड्रीमलँड सेंटरवर आज पुन्हा पेपर फुटला. जलसंधारण अधिकाऱ्यांनीच पेपर फोडून परिक्षार्थ्यांना उत्तरे पुरवल्याची माहिती आहे. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. परीक्षा नवी पण पेपर फुटीचा पॅटर्न तोच. या सरकार ला अजून काय पुरावे हवेत? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केला होता.

◆मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाटच◆

राज्यात खळबळ उडविणाऱ्या या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाटच आहे.गुन्हे शाखेच्या युनिट क्र.2 ने आजवर बारा आरोपींना अटक केली होती त्यांना न्यायालयाने जामीनही दिला मात्र मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस अद्यापही पोहचू शकले नाहीत. एक एक कडी जोडून आपण मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचू असा विश्वास पोलिसांना आहे मात्र या प्रकरणात मोठे अधिकारी व राज्यातील मंत्री देखील सहभागी असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!