spot_img

जागावाटपाचे कोडे:होळीपर्यंत लांबणार महायुतीचा निर्णय,आता तुमचे तुम्ही बघा!

जागावाटपाचे कोडे:होळीपर्यंत लांबणार महायुतीचा निर्णय,आता तुमचे तुम्ही बघा!

◆मिररवृत्त
◆मुंबई

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र अजूनही राज्यात महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले नाही. १७ मार्च रोजी मुंबईत राहुल गांधींच्या उपस्थितीत इंडिया आघाडीची सभा आहे. त्यानंतर सोमवारी मविआचा निर्णय जाहीर होऊ शकतो. महायुतीत १० जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्याचा निर्णय राज्यात होऊ शकलेला नाही. त्यामुळे दिल्लीतील भाजप नेत्यांना हस्तक्षेप करूनच यात तोडगा काढावा लागेल. दरम्यान, २५ मार्चपर्यंत तोडगा निघेल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात सांगितले.
आचारसंहिता लागण्याच्या ३ तास आधी आठवड्यातील तिसरी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. त्यात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दरम्यान,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार जाहीर झाल्याचे सांगून ‘आता तुमचे तुम्ही बघा’ असा अप्रत्यक्ष इशारा पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

◆’सगेसोयरे’ बाबत प्रक्रियेसाठी चार महिने लागणार : मुख्यमंत्री◆

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगेसोयरे व्याख्यासंदर्भात अधिसूचनेवर ८.४७ लाख हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ४ लाख हरकतींची छाननी पूर्ण झाली आहे. उर्वरित छाननी सुरू आहे. त्यासाठी २५ ते ३० दिवस लागतील. ४ महिन्यांत त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी तातडीने निर्णय घेण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

◆आचारसंहिता लागण्याच्या ३ तास आधी निर्णयांचा धडाका◆

◆कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद.
◆कंत्राटी ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार मालमत्ता
◆विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास.दंडाची रक्कमही वाढवण्यात आली.
◆१३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चास मंजुरी.
◆संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार
◆शासकीय-निमशासकीय जागांवर मोफत चित्रीकरण.
◆विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. त्यांच्या कल्याणासाठी ५० कोटींचे भागभांडवल.
◆पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ.
◆संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबवणार.
◆राज्य पोलिस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यापुढे वापर करण्यावर देणार भर.
◆ऑटोरिक्षा, टॅक्सीचालकांसाठी कल्याणकारी मंडळ.५० कोटी अनुदान.
◆संगणकीय न्याय सहायक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार.
◆वृद्ध साहित्यिक, कलाकारांना ५ हजार रुपये मानधन.
◆राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!