spot_img

मोदीजी आपसे बैर नही,राणा तेरी खैर नहीः अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात बॅनरबाजी; राजकारण तापले

मोदीजी आपसे बैर नही,राणा तेरी खैर नहीः
◆अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात बॅनरबाजी; राजकारण तापले

◆मिररवृत्त
◆अमरावती

अमरावती लोकसभा खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, अमरावती लोकसभा मतदारसंघात अज्ञात लोकांनी मोदीजी आपसे बैर नही,राणा तेरी खैर नही, अशी बॅनरबाजी करत नवनीत राणांची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे.खासदार राणा भाजपकडून निवडणूक लढणार,अशी माहिती अमरावती लोकसभा मतदारसंघात पसरली.त्यानंतर सायंकाळी राणांविरोधात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही, असा मजकूर
असलेले बॅनर्स अमरावतीत्या शहराच्या राजापेठ चौकात अज्ञात व्यक्तीने लावले आहेत.सध्या हे बॅनर्स चर्चेचा विषय ठरत असून यामुळे राणा दाम्पत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरुन अपक्ष निवडून आल्या होत्या. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव आडसूळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला.आता त्या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

◆शिंदे गट आग्रही◆

नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरुन निवडून आल्या. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपला नेहमीच पाठिंबा दिला.शिवाय, आगामी लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवण्यासाठी त्या इच्छुक आहेत. मात्र,भाजपचे या मतदारसंघात काम नाही. राणा निवडून येण्यापूर्वी अमरावतीत शिवसेनेचे वर्चस्व होते.शिवाय शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करुनच नवनीत राणा निवडून आल्या होत्या.त्यामुळे शिंदेंची शिवसेना या जागेबाबत आग्रही आहे.तर दुसरीकडे नवनीत राणा यांना ही जागा भाजपकडून लढवायची असल्याचे बोलले जात आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!