spot_img

कॉपी पुरविणाऱ्या ‘त्या’अधिकाऱ्यावर अद्याप कार्यवाही नाही ,तपास संशयास्पद, केवळ उमेदवारावर गुन्हा दाखल

कॉपी पुरविणाऱ्या ‘त्या’अधिकाऱ्यावर अद्याप कार्यवाही नाही

●तपास संशयास्पद, केवळ उमेदवारावर गुन्हा दाखल

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

बुधवार दि.२१ फेब्रुवारी रोजी ड्रीमलँड मधील ए.आर.एन असोसिएटस् या ठिकाणी सुरू असलेल्या जलसंधारण विभागाच्या परीक्षेला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने ‘कॉपी’ पुरविल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता.याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी कॉपी करणाऱ्या उमेदवारावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले मात्र या पेपरफुटीच्या प्रकरणातील कॉपी पुरविणारा मुख्य सूत्रधार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. शिवाय तपास संशयास्पद असल्याचा आरोप एनएसयुआय च्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
ए.आर.एन असोसिएटस् या ठिकाणी बुधवारी सुरू असलेल्या जलसंधारण विभागाच्या परीक्षेच्या वेळी उमेदवाराच्या हॉल तिकीटवर संबंधित अधिकाऱ्याने प्रश्नांची उत्तरे लिहून आणल्याने विद्यार्थ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. खूप वेळ त्याठिकाणी गोंधळ निर्माण झाल्यानंतर परीक्षा केंद्राच्या अधिकाऱ्यांनी नांदगाव पेठ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी कॉपी करणाऱ्या यश हेमंत कावरे या उमेदवारास ताब्यात घेऊन त्याच्यावर परीक्षेत गैरप्रकार केल्याबद्दलगुन्हा दाखल केला मात्र ती कॉपी पोहचवीणारा अधिकारी मात्र अद्यापही या प्रकरणातून बाहेर आहे. त्यामुळे तपासाची भूमिका संशयास्पद असून यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप अमरावती विधानसभा युवक कॅांग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष संकेत कुलट, एनएसयुआय शहराध्यक्ष संकेत साहू, युवक कॅांग्रेस महासचिव आकाश गेडाम, भाजयुमोचे रुषिकेश देशमुख,स्टुडंट्स राईट संघटनेचे अक्षय नरगाडे यांनी केला आहे.
परीक्षा सुरू होण्यापूर्वी यश आणि संबधीत अधिकारी ड्रीमलँड परिसरात सोबत असल्याचे व बोलत असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी बघितले होते. त्यानंतर जेव्हा संबंधित अधिकारी परीक्षाकेंद्रावर यश जवळ कॉपी घेऊन आला तेव्हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार हणमंत डोपेवाड हे काल पासून या प्रकरणाच्या बाबतीत सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती बाहेर आलेली नही हे विशेष!

●तपास सुरू आहे-हणमंत डोपेवाड●

याप्रकरणी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकरणाचा योग्य तपास सुरू असल्याचे सांगितले शिवाय अटक आरोपी यश कावरे याला बुधवारी न्यायालयासमक्ष हजर करून पोलीस कोठडी मागण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!