spot_img

जलसंधारण विभागाचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांमध्ये संताप ,विभागाच्या कर्मचाऱ्यानेच दिली परीक्षार्थी उमेदवारास कॉपी

जलसंधारण विभागाचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांमध्ये संताप

◆विभागाच्या कर्मचाऱ्यानेच दिली परीक्षार्थी उमेदवारास कॉपी

◆पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याला घेतले ताब्यात

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

ड्रीमलँड येथील एका परीक्षा केंद्रावर जलसंधारण विभागाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा पेपर विभागाच्याच एका कर्मचाऱ्याने फोडल्याचा आरोप असून, यामुळे विद्यार्थ्यांत कमालीचा रोष पसरला आहे.सदर कर्मचाऱ्याने उत्तरे असलेला एक कागद परीक्षार्थी उमेदवारास दिल्याने ही बाब उघडकीस आली.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाच्यावतीने विविध पदांसाठी नुकतीच जाहिरात देण्यात आली होती. या पदांसाठी 20 व 21 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी अमरावती येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे मृदू व जलसंधारण विभागाच्या एका कर्मचाऱ्यानेच परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून उत्तरे पुरवण्यास मदत केल्याचा आरोप आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. पण त्या परीक्षेतील गोंधळ अद्याप सुटला नाही. त्यातच ही घटना घडल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्यानंतर नांदगाव पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले व कॉपी देणाऱ्या त्या कर्मचाऱ्यास ताब्यास घेतले.वृत्त लिहिस्तोवर कार्यवाही करण्यात आली नव्हती मात्र या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!